baipan bhaari deva on ott hotstar streaming in marathi and hindi kedar shinde SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva OTT: नवीन वर्षात आनंदाची बातमी! 'बाईपण भारी देवा' या ओटीटीवर पाहा घरबसल्या

बाईपण भारी देवा सिनेमा अखेर ओटीटीवर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva OTT News: 'बाईपण भारी देवा' सिनेमाने २०२३ वर्ष चांगलंच गाजवलं. २०२३ च्या जून महिन्यात बाईपण भारी देवा रिलीज झाला. आणि सिनेमाने बॉक्स ऑफीसवर भरघोस कमाई केली.

महिलावर्गाने सिनेमा पाहायला गर्दी केलीच शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सिनेमा आवडला. थिएटर गाजवणारा 'बाईपण भारी देवा' ओटीटीवर कधी पाहायला मिळणार, याची अनेकांना उत्सुकता होती.

अखेर प्रतीक्षा संपली आहे. 'बाईपण भारी देवा' ओटीटीवर रिलीज झालाय. कधी? कुठे? पाहायचा. वाचा पुढे.

'बाईपण भारी देवा' या ओटीटीवर झाला रिलीज

बाईपण भारी देवा बोले तो लय भारी असं कॅप्शन देत डिझ्ने + हॉटस्टारने बाईपण भारी देवा ओटीटीवर रिलीज झाल्याची घोषणा केलीय. यामुळे आता हॉटस्टारवर 'बाईपण भारी देवा' रिलीज झालाय.

हॉटस्टारच्या माध्यमातून सहकुटुंब 'बाईपण भारी देवा' सुपरहिट आस्वाद सर्वांना घेता येईल. विशेष म्हणजे मराठीसोबतच हिंदीमध्येही 'बाईपण भारी देवा' हॉटस्टारवर रिलीज करण्यात आलाय. त्यामुळे अमराठी लोकांनाही 'बाईपण भारी देवा' बघता येईल.

बाईपण भारी देवा चा नवा रेकॉर्ड

'बाईपण भारी देवा' सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माते JIO STUDIOS ने 'बाईपण भारी देवा' सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट जारी केलाय. यात पहायला मिळतं की, बाईपण भारी देवा सिनेमाने ७६. ०५ कोटींची कमाई केलीय.

२०२३ मध्ये जे मराठी सिनेमे रिलीज झालेत त्या सर्व सिनेमांमध्ये बाईपण भारी देवा सिनेमाची कमाई ऐतिहासीक म्हटली जाते.

बॉलिवूडचे गदर 2 आणि OMG 2 हे मोठे सिनेमे समोर असुनही बाईपण भारी देवाने चांगली कमाई केली.

बाईपण भारी देवावर कौतुकाचा वर्षाव

३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात सहा अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखो मनं जिंकली.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT