Bajrangi Bhaijaan 2 Esakal
मनोरंजन

Bajrangi Bhaijaan 2 मधून करीनाचा पत्ता कट?; सीक्वेलमध्ये 'ही' साऊथ अभिनेत्री दिसणार अशी चर्चा..

बजरंगी भाईजानच्या पहिल्या भागात सलमान खान सोबत करिना कपूर दिसली होती. सिनेमाचा सीक्वेल आता लवकरच येत आहे.

प्रणाली मोरे

Bajrangi Bhaijaan 2 : 2015 साली आलेल्या 'बजरंगी भाईजान' सिनेमानं बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई करण्यासोबतच भारत-पाकिस्तान हा विषय इतक्या सुंदरपणे पडद्यावर मांडला होता ज्यानं सगळ्यांची मनं जिंकली होती.

या सिनेमात सलमान खान,करिना कपूर,नवाझुद्दिन सिद्दीकी, ओम पुरी असे मातब्बर कलाकार होते. हर्षाली मल्होत्रा या लहान मुलीनं देखील आपल्या पहिल्याच सिनेमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

हिंदू आणि मुसलमान या द्वंद्वात फसलेली एक लहान पाकिस्तानी मुलगी आणि तिला सुरक्षित ठेवण्यासाठी झटणारा हनुमान भक्त यांच्यातील नातं सिनेमात दाखवलं गेलं होतं. आता या सिनेमाचा सीक्वेल येतोय अशी चर्चा आहे.

यामध्ये कोण कोण असणार,हा सिनेमा कधी येईल,याची कथा काय असेल असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या डोक्यात असताना आता या सीक्वेलसंदर्भात भलतंच काहीतरी कानावर पडत आहे. बातमी कळतेय की या सीक्वेलमध्ये करीना कपूर ऐवजी पूजा हेगडे सिनेमात दिसणार आहे. आता यात काय खरं आणि काय खोटं हे लवकरच कळेल.

मध्यंतरी बातमी होती की करीना कपूर खान बजरंगी भाईजानच्या सीक्वेलमध्ये दिसणार नाही. तिला दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे रिप्लेस करणार असल्याचं बोललं जात होतं. तसंच या सिनेमाचं नाव 'पवनपुत्र भाईजान असेल' हे देखील समोर आलं होतं.

आता अशी बातमी समोर आल्यानं करिनाच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला होता. करीना सिनेमाचा महत्त्वाचा भाग होती आणि असं असताना तिला सीक्वेलमधून कसं बाजूला केलं असे अनेक प्रश्न निर्माण झाले.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

ईटाईम्सला एका सूत्राकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे बोललं जात आहे की, सिनेमाचं टायटल 'पवनपुत्र..' असेल ही बातमी खरी आहे. पण बाकी सगळ्या अफवा आहेत. अजूनपर्यंत कोणती स्क्रिप्टच समोर आलेली नाही तर कलाकारांना रिप्लेस कसं केलं जाईल? सीक्वेल अद्याप कागदावरच आहे. प्रॉडक्शनच्या कोणत्याच कामाला सुरुवात झालेली नाही. अशामध्ये करीना कपूरला सिनेमातून बाहेर करण्याची बातमीच चुकीची आहे.

माहितीसाठी इथं सांगतो की, पूजा हेगडेला अद्याप इंडस्ट्रीत चांगला सूर गवसलेला नाही. तिचे अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप झालेयत. ना साऊथमध्ये तिचं नाणं वाजलंय ना बॉलीवूडमध्ये. लवकरच ती आता सलमान सोबत 'किसी का भाई..किसी की जान' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा २१ एप्रिलला रिलीज होत आहे. त्यानंतर कळेल प्रेक्षकांनी तिला पसंत केलं आहे की नाही..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT