summet pusavale photos, sumeet pusavale wedding SAKAL
मनोरंजन

Sumeet Pusavale: बायकोसोबत 'बाळूमामा' फेम सुमित पुसावळे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात, फॅन्सची गर्दी

सूमित पुसावळेने मोनिका महाजन सोबत १४ डिसेंबरला लग्न केलं.

Devendra Jadhav

Summet Pusavle at Kolhapur: कलर्स मराठीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सुमित पुसावळे. सूमित पुसावळेने मोनिका महाजन सोबत १४ डिसेंबरला लग्न केलं. लग्नानंतर सुद्धा सुमित पुसावळेने चर्चेत आहे. सुमित बायकोसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असतो. सुमित आणि मोनिका पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सुमितने मोनिका सोबत कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं. लग्नानंतर सुमित ठिकठिकाणी बायकोसोबत देवदर्शनाला जात आहे. लग्नानंतर सुमित पहिल्यांदाच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेला. महालक्ष्मी मंदिरात गेल्यावर सुमितच्या चाहत्यांनी त्याला भेटण्यासाठी गर्दी केली. अगदी पोलिसांपासून सामान्य माणसांपर्यंत प्रत्येक जण सुमितला भेटण्यासाठी उत्सुक होते. फॅन्सनी सुमित सोबत फोटोही काढला.

सुमित आणि मोनिकाने १४ डिसेंबरला थाटामाटात लग्न केलं. या दोघांचा सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या लग्नाला सुमितचे सहकलाकार, मित्र मंडळी तसेच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. याशिवाय मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सुमितवर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

लागीरं झालं जी या मालिकेतून सुमितने छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सुमित या मालिकेत छोटयाश्या पण महत्वाच्या भूमिकेत दिसला. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत सुद्धा सुमितने ऐतिहासिक भूमिका साकारली. पुढे बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मालिकेने सुमितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेत सुमीत संत बाळूमामांची भूमिका साकारत आहे.

गेली जवळपास ४ वर्ष सुमित बाळुमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक ठिकाणी बाळूमामाची भूमिका साकारणारा सुमित पुसावळेच्या लोकं पाया पडतात. सुमित आणि मोनिका या न्यू ली वेड कपलची सगळीकडे चर्चा असते. लग्नाआधी सुमित आणि मोनिका यांचे फोटोशूट चर्चेत होतं. दोघांनी रोमँटीक आणि हटके फोटोशूट केलेलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

Pachod Accident : हळदीचा कार्यक्रम उरकून घरी परतणाऱ्या मावसभावाचा दूचाकी धडकून मृत्यू

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

SCROLL FOR NEXT