Bambai Meri Jaan Controversy  esakal
मनोरंजन

Bambai Meri Jaan Controversy : ‘बम्बई मेरी जान’ मधील 'ती' गोष्ट मनसेला खटकली! आता विषय संपला, दिला कडक शब्दांत इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बंबई मेरी जानमधील निर्मात्यांना परखड शब्दांत इशारा दिला आहे.

युगंधर ताजणे

Bambai Meri Jaan Web Serise MNS Amey Khopkar x post : वेब विश्वात सध्या एका मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बंबई मेरी जान असे त्या मालिकेचे नाव आहे. त्यावरुन आता वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बंबई या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बंबई मेरी जानमधील निर्मात्यांना परखड शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या मालिकेवरुन नवीन वाद समोर येण्याची चिन्हे दिसून आली आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसादही मोठा होता. केके मेननची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेची अनेक दिवसांपासून चर्चा होती.

Also Read - सारखी चक्कर येते? मग नका करु दुर्लक्ष...'हे' असू शकतं कारण!

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेमध्ये सत्तरीच्या काळातील मुंबईचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. तेव्हा मुंबईमध्ये असणारी गुन्हेगारी, गुन्हेगारी विश्वाचे धागेदोरे, वेगवेगळे गुंड, त्यांच्या टोळ्या आणि टोळीयुद्ध यावर आधारित मालिकेतून एका बड्या गुंडाची कथा उलगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर नेहमीच तुरी देत सटकणाऱ्या त्या गुंडानं साऱ्या जगात आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली. पण याची सुरुवात कशी झाली, हे सांगणारी सीरिज म्हणून 'Bambai Meri Jaan' कडे पाहावे लागणार आहे.

यासगळयात खोपकर यांनी केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी म्हटले आहे की, "नावात काय आहे?" असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा‘तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या India ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही.

"भारत" नाव बदलासाठी आग्रही असणारे लोक ‘मुंबई‘च्या नाव बदला संदर्भात इतके उदासीन कसे? अहो ‘बॉम्बे‘ आणि ‘बम्बई‘चे ‘मुंबई‘ करण्यासाठी कित्येक लोकांनी किती परिश्रम केले.. हे आपण विसरलो का? राजकीय दस्तावेजांमधून अधिकृतरित्या जरी जुने नाव हद्दपार झाले असले, तरीही अमराठी आगंतुकांच्या वाणीवरून आणि मनावरून हे नाव पुसून टाकण्याचा लढा आजही चालू आहे.

असो.. अजून मी ही वेब सिरीज पाहिलेली नाही. बघतोच! आणि मुंबई ऐवजी ‘बंबई‘ वापरण्याची इतकी काय क्रिएटिव्ह गरज होती हेही बघतो.. पटलं तर ठीक आहे.. अन्यथा खळ्ळ खटॅक्क!! अशा शब्दांत खोपकर यांनी बंबई मेरी जानच्या मेकर्सला इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT