Bappi Lahiri and Ranveer Singh during a concert. Google
मनोरंजन

रणवीरनं आपल्या बायोपीकमध्ये काम करावं अशी बप्पी लाहिरींची इच्छा होती पण...

दिवंगत संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांचा मुलगा बाप्पा लाहिरीनं एका मुलाखतीत याविषयी खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

डिस्को म्युझिकची क्रेझ भारतातील म्युझिक लव्हर्समध्ये निर्माण करण्यात दिवंगत ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरीं(Bappi Lahiri) चा मोठा वाटा आहे. ८०-९० सालात जेव्हा पार्टीज् आयोजित केल्या जायच्या तेव्हा तिथे बप्पी लाहिरींच्या गाण्यांशिवाय कुठल्याच गाण्याला थारा नसायचा. आपल्या संगीतातील अमूल्य कार्यामुळे अनेक पारितोषिकांनी गौरविल्या गेलेल्या बप्पी लाहिरी यांचं १५ फेब्रुवारी २०२२ मध्ये निधन झालं आणि बॉलीवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या निधनानंतर मुलगा बाप्पा लाहिरी यानं त्यांच्या काही इच्छा एका मुलाखतीत बोलून दाखवल्या आहेत.

बप्पी लाहिरीनं मुलाखतीत सांगितलं की तो आपल्या वडिलांवर एक बायोपीक काढण्याचा विचार करीत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की बप्पी लाहिरींना आपल्यावर बनणाऱ्या बायोपीकमध्ये कोणत्या अभिनेत्याला घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. बप्पी लाहिरींनी ते नाव आधीच पक्क करुन ठेवलं आहे. ते नाव आहे बॉलीवूडचा 'गली बॉय' रणवीर सिंग. अभिनेता रणवीर सिंगनं आपल्या बायोपीकमध्ये काम करावं अशी इच्छा बप्पी लाहिरींनी त्याच्याजवळ देखील बोलून दाखवली होती..

बप्पी लाहिरी यांचा मुलगा बाप्पा लाहिरीनं इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की,''बप्पी लाहिरी यांची इच्छा होती की त्यांच्या बायोपीकमध्ये रणवीर सिंगने काम करावे. तीन चार-वर्षांपूर्वी यासंदर्भात रणवीर सिंग आणि निर्मात्यांशी बोलणं झालं होतं. माझ्या वडिलांना (बप्पी लाहिरी) रणवीर खूप आवडायचा. त्यांची जबरदस्त इच्छा होती रणवीरनं त्यांच्या बायोपीकमध्ये काम करावं .कोणी दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा बायोपीक बनवताना त्यामुळे आधी रणवीर सिंगचाच विचार होणार. बघू सगळं नीट जुळून आलं तर कदाचित लवकरच रणवीर बप्पी लाहिरी यांच्या बायोपीक मध्ये दिसेल''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT