bb 17 grand finale ankita lokhande emotional after not winning trophy video viral SAKAL
मनोरंजन

BB 17 Ankita Lokhande: बिग बॉसमध्ये विजयी न झाल्याने अंकीता भावूक? व्हिडीओ व्हायरल

अंकीता लोखंडेचा बिग बॉस 17 ग्रँड फिनालेनंतरचा व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

BB 17 Ankita Lokhande News: बिग बॉस 17 ची ग्रँड फिनाले काल झाली. सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 17 चा सीझन चांगलाच गाजला. या सीझनमध्ये मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनावर फारुकी, अंकीता लोखंडे, अरुण माशेट्टी हे ५ जणं फायनलपर्यंत पोहोचले.

यापैकी मुनावर फारुकीने बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. अंकीताला बिग बॉसचं विजेतेपद मिळवता न आल्याने तिला चांगलंच दुःख झालेलं दिसतंय.

अंकीताचा बिग बॉस संपल्यावर व्हिडीओ व्हायरल

अंकिता लोखंडेने बिग बॉस 17 चे विजेतेपद गमावले. फिनालेपूर्वी अंकिता लोखंडे सोशल मीडियावर टॉप-2 सदस्यांपैकी एक मानली जात होती. पण ग्रँड फिनालेच्या रात्री मतांच्या कमतरतेमुळे तिला मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि मुनावर फारुकी यांच्यासमोर घरातून बाहेर काढण्यात आले. अशा स्थितीत तिचा चेहरा पडला.

अंकिताचा ग्रँड फिनालेनंतरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं म्हणत आहेत की, तिला पराभव सहन होत नाही आणि ती रडली.

अंकीता हरल्यावर रडली

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या कुटुंबासह बिग बॉस 17 च्या सेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत आहे. तिचा उदास चेहरा पाहून लोकांचा अंदाज आहे की, हरल्यानंतर ती खूप रडली असेल.

विजेतेपदाची प्रमुख दावेदार मानली जात असलेल्या अंकीताचे फॅन्स मात्र ती जिंकली नाही म्हणून नाराज झाले असतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT