bb ott 2 finale abhishek malhan go to the hospital after finale and share heartwarming message to fans SAKAL
मनोरंजन

Abhishek Malhan: बिग बॉसची ट्रॉफी हुकली, पुन्हा रुग्णालयात दाखल, फुकरा इन्सानने मागितली फॅन्सची माफी

फिनालेनंतर अभिषेक पुन्हा हॉस्पीटलमध्ये पुन्हा दाखल झालाय आणि त्याने फॅन्सना संदेश दिलाय

Devendra Jadhav

Abhishek Malhan News: अभिषेक मल्हान हा बिग बॉस ओटीटी 2 चा उपविजेता ठरला. अभिषेक मल्हान हा बिग बॉसचा विजेचा होईल असं अनेकांना वाटत होतं. पण अभिषेक उपविजेचा ठरला.

अभिषेक फिनालेआधी हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याच्या बहिणीने खुलासा केला होता. आता फिनालेनंतर अभिषेक पुन्हा हॉस्पीटलमध्ये पुन्हा दाखल झालाय.

अभिषेक मल्हान फिनालेच्या रात्री थेट हॉस्पिटलमधून शोमध्ये सहभागी झाला. तिथून त्याने एक व्हिडिओ बनवला आणि तो चाहत्यांशी शेअर केला.

अभिषेक मल्हानने 'बिग बॉस OTT 2' मध्ये पूर्ण 58 दिवस घालवले. शो जिंकण्यासाठी त्याने सर्व प्रयत्न केले. पण शेवटी त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र जनतेचे इतकं प्रेम मिळाल्याने तो खूश आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो फिनालेमध्येही परफॉर्म करू शकला नाही. एवढेच नाही तर त्याच्या चेहऱ्यावरही उत्साह दिसत नव्हता. तो आतून इतका कमजोर वाटत होता की एल्विशकडून ट्रॉफी घेतल्यानंतर तो शोमधून पुन्हा हॉस्पिटलला रवाना झाला. यावेळी त्याचे आई-वडीलही तेथे होते.

अभिषेकने फॅन्ससाठी दिला खास मॅसेज

हॉस्पिटलच्या बेडवर पडून अभिषेक मल्हानने बनवलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, 'सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. ज्यांनी मला वोट केले त्या सर्वांना. मला माहित आहे की मी ट्रॉफी आणू शकलो नाही पण तुम्ही मला जे प्रेम देत आहात ते मी पाहिलं. देवाची शपथ तुम्ही लोक देत असलेल्या मी पात्र आहे असे मला वाटत नाही. मी बिग बॉसच्या सेटवरून नुकताच हॉस्पिटलमध्ये परतलोय.

तुम्ही मला दिलेले प्रेम हीच माझ्यासाठी ट्रॉफी

अभिषेक मल्हान पुढे म्हणाला की, 'मी सर्व मीडियाची माफी मागतो. ज्यांना माझी मुलाखत घ्यायची होती किंवा मी त्यांच्याबद्दल, शोबद्दल काहीतरी सांगू इच्छित होते. पण मी काय करू शकत नाही. मला दवाखान्यात यावे लागले. लवकरच, मी येथून लवकर बरा होईल. मी माझ्या भावना सर्वांसमोर व्यक्त करू शकतो. होय, ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांना निराश केले कारण मी ट्रॉफी घरी आणू शकलो नाही. पण मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले. पण तुम्ही मला दिलेले प्रेम हे माझ्यासाठी ट्रॉफी आहे. एल्विशचे अभिनंदन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Disruption : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई-ठाणे लोकल रेल्वेसेवा खोळंबली, प्रवाशांचे प्रचंड हाल

Kolhapur Crime News : डॉक्टर मुलीने ७८ वर्षीय वडिलांना चावून बोटचं तोडलं, छातीवर लाथ मारली अन्; कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

Political Violence: कट्टर भक्तांचा कहर... RJD ची स्तुती केली म्हणून NDA समर्थक मामांनी भाचाला संपवलं, कुठं घडली घटना?

आनंदाची बातमी ! धावत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, हेल्पलाइनवरून परत मिळवा; साखळी खेचल्यास हाेणार दंड; मदतासाठी काय करावा लागणार?

Sheikh Hasina : शेख हसीना यांची फाशी रद्द होणार की नाही? आता निर्णय भारताच्या हातात, जाणून घ्या काय आहे नियम

SCROLL FOR NEXT