akshay kumar bell bottom movie  team esakal
मनोरंजन

अक्षयच्या 'बेल बॉटम'वर चाहत्यांच्या उड्या, ट्रेलर व्हायरल

अवघ्या काही तासांत त्याला लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडच्या खिलाडीनं (bollywood khiladi) त्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर दिली आहे. ती म्हणजे त्याच्या आगामी आणि बहुप्रतिक्षेत असलेल्या बेल बॉटम (bell bottom नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही तासांत त्याला लाखो व्ह्युजही मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या या चित्रपटाची सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चर्चा होती. ट्रेलर पाहून तो चित्रपट किती रंजक असणार आहे याची कल्पना अक्षयच्या चाहत्यांना आली आहे. ट्रेलरमध्ये अक्षय एका दमदार अंदाजात दिसुन येतो आहे. कोरोना काळात त्यानं या चित्रपटाविषयी सांगितलं होतं.

अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं भारलेल्या या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा प्रमुख भूमिकेत आहे. त्याशिवाय वानी कपूर, हुमा कुरेशी यांच्याही भूमिका त्यात आहेत. एका आगळ्या विषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. त्यामुळे त्याच्याबाबत प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बेल बॉटम काय असणार आहे याविषयी आपल्याला कळून येते. त्यात राजकारण, परकीय धोरणं, मुत्सदीपणा, अंतर्गत सुरक्षा, सुरक्षा यंत्रणा, अधिकाऱ्यांचे आयुष्य यासारख्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्याची सध्या चर्चा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ट्रेलरनं चाहत्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. मे मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ऑगस्टमध्ये अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात अजयचा भुज सर्वाधिक चर्चेतील चित्रपट आहे.

निर्मात्यांना असा विश्वास आहे की, अक्षयचा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. दोन वेळा या चित्रपटाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे फायनली तारिख ठरलेल्या बेल बॉटम चित्रपटाला प्रेक्षक न्याय देतील अशी आशा निर्मात्यांना आहे. बेलबॉटम बाबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट थ्री डी मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याविषयी अक्षयनंच माहिती दिली आहे. त्याबाबत त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यानं लिहिलं आहे की, 19 ऑगस्टला बेल बॉटम वेगळ्या अनुभवाचा आनंद घेऊन पाहायला विसरु नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT