Bharti Singh and Haarsh Limbachiyaa shared first photo of their baby boy sakal
मनोरंजन

भारती सिंगचं बाळ आहे तिच्याप्रमाणेच गुटगुटीत ! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल..

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबचिया यांच्या बाळाचा पहिला फोटो समोर आला आहे.

नीलेश अडसूळ

Tv Entertainment: कॉमेडियन भारती सिंग ही कायमच चर्चेत असते. तिचे विनोद, तिचा हजरजबाबी पणा यामुळे तीने चाहत्यांना वेड लावलं आहे. तिच्या विडिओ पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण भारती तिच्या गरोदरपणामुळे आणि बाळंतपणामुळे अधिक चर्चेत आली. भारती प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत सेटवर काम केले होते. तर बाळंत (Entertainment News) झाल्यानंतर अकरा दिवसांनीच ती पुन्हा सेटवर परतली यावरून तिला ट्रोलही केले गेले पण त्यावरही भारतीने सडेतोड उत्तर दिले. नुकतेच भारतीने (Bharti Singh) एका व्हिडिओतून तिच्या मुलाचे नाव सांगितले. 'लक्ष' असे तिच्या मुलाचे नाव आहे. भारती आणि हर्ष यांचे बाळ पाहण्याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर भारती आणि हर्षने बाळसोबत फोटो शेअर केला आहे. (Bharti Singh and Haarsh Limbachiyaa shared first photo of their baby boy)

हर्षने (haarsh limbachiyaa ) शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या लाडक्या बाळाची म्हणजे लक्षची झलक दिसली आहे. या फोटोमध्ये हर्ष आणि भारतीसोबत त्यांचा मुलगा गोला म्हणजेच ‘लक्ष्य’ही दिसत आहे. मात्र, फोटोत मुलाचा चेहरा दिसलेला नाही. भारतीने मुलाला उचलून घेतले आहे, तर भारतीच्या खांद्यावर हात ठेवून हर्ष हसत आहे. या अतिशय सुंदर फोटोला हर्षने 'फॅमिली' असे कॅप्शन दिले आहे.

या फोटोत बाळाचा चेहरा दिसला नसला तरी फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहतेच नाही तर, मनोरंजन विश्वातील स्टार्सही फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. करणवीर बोहरा, कोरिओग्राफर धर्मेश, अभिनेत्री युविका चौधरी, नेहा भसीन, आध्विक महाजनी आणि अली गोनी यांनी हर्षच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT