Bharti Singh
Bharti Singh Google
मनोरंजन

'गुजरात तर ड्रिंकिंग स्टेट,चियर्स म्हणारे गुजू माझ्याच घरी'-भारती सिंग

प्रणाली मोरे

कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) नेहमीच आपल्या विनोदी शैलीतनं काहीतरी भाष्य करून समोरच्या प्रेक्षकांची दाद मिळवत असते. ती आता लवकरच आई बनणार आहे. पण तिची ती बातमीही तिनं इतक्या मजेदारपणे दिली होती की सोशल मीडियावर त्या बातमीच्या पोस्टनंतर भारतीचाच बोलबाला होता. येत्या मार्च-एप्रिल महिन्यात भारती तिच्या पहिल्या अपत्याला जन्म देईल. सध्या ती 'हुनरबाज' या नवीन रिअ्ॅलिटी शो चं सूत्रसंचालन करीत आहे. या शो चं सूत्रसंचालन करताना नेहमीप्रमाणे तिचा नवरा हर्ष लिंबाचिया तिच्या सोबत दिसणार आहे. याआधी त्या दोघांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन एकत्र केले आहे. 'हुनरबाज'च्या एका भागात तर तिनं घोषित केलं की, ''प्रेग्नंट असलेली सर्वात पहिली सूत्रसंचालक आहे मी. चॅनल मात्र मला दोघांचे पैसे न देता एकाचेच पैसे देत आहे''. आता हा तिचा विनोदी स्वभाव म्हणावा. पण त्याहीपुढे एक पाऊल जात तिनं आता आपल्या सासऱ्यांविषयी असं भाष्य केलंय की जो-तो 'भारती तेरी तो कमाल है','सूचतं कसं तुला' अशा प्रतिक्रिया देत सुटला आहे.

भारतीनं नुकताच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. तिला मुलाखतीत जेव्हा विचारलं गेलं की, ''तु पंजाबी आणि तुझं सासर गुजराती म्हणजे ड्रिंकचा तर सवालच नाही''. पण यावर भारती तडक म्हणाली,''ते ड्राय स्टेट आता ड्रिंकिंग स्टेट झालंय. माझ्याच घरात माझे सासरे माझ्यासोबत ड्रिंकसाठी बसतात. आम्ही मस्त एकमेकांना चियर्स म्हणत ड्रिंकचा आस्वाद घेतो. कधीकधी तर मी शुटिंगहून यायला लेट झाला तर ते कॉल करून विचारतात,मी बसू की तूझ्यासाठी थांबू?'' पुढे ती म्हणाली,''आता कोण म्हणेल गुजरातला ड्राय स्टेट. आमच्याच घरात मोठं उदाहरण आहे''. भारतीनं आपलं सासऱ्यांसोबतचं बॉंडिंगच इथं शेअर केलं आहे मुलाखतीतून. भारतीनं हर्ष लिंबाचियाशी २०१७ मध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. हर्ष हा स्क्रीप्ट रायटर आणि सूत्रसंचालकही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT