bharti and harsh news releted drugs case 
मनोरंजन

'माझा नवरा, माझी ताकद, माझा मित्र, सगळं काही'..

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कॉमेडियन भारती सिंहवर ड्रग्जचे आरोप करण्यात आले होते. तिला आणि तिच्या पतीलाही याप्रकरणी अटक केली होती. आता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. पतीच्या सुटकेनंतर त्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली त्यात तिनं आपल्या पतीविषयी लिहिले आहे. त्याच्याबद्दल गौरवादगार काढले आहेत.

भारतीनं पोस्ट केलेला तो फोटो मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यावर खूप सा-या कमेंटही येत आहेत. तिच्या पतीचं नाव हर्ष असून तिनं त्याला आपली प्रेरणा असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली. माझा नवरा ही माझी ताकद, माझी प्रेरणा आणि माझं सर्वस्व आहे. निराशेचे मळभ दाटून येतात अशावेळी काहीही मनासारखे होत नाही. ही वेळ आमच्यासाठी योग्य नव्हती. कदाचित आमची परिक्षा पाहण्यासाठी अशाप्रकारचा प्रसंग ओढावला असावा. मात्र कुठल्याही हार न मानता आपलं काम सुरु ठेवण्यासाठी संघर्ष सुरु ठेवावा लागेल.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येनंतर सुरु झालेल्या तपासानं वेगवेगळी वळणे घ्यायला सुरुवात केली. यातून त्यापैकी बॉलीवूड ड्रग्ज केस प्रकरण. त्यात अनेकांची नावे समोर आली आहेत. या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावे समोर आली होती. या यादीत भारती सिंहचे नाव होते. त्यामुळे केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) कॉमेडी क्वीन भारती सिंगला अटक केली होती. 

भारतीचे कार्यालय आणि घरात एनसीबीने टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर भारती हिचा पती हर्ष लिंबाचिया याचीही एनसीबीकडून चौकशी सुरु होती 18 तासांच्या चौकशीनंतर भारती सिंगचा पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीनं अटक केली होती. यासगळ्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले होते.

भारती आणि तिच्या पतीला ट्रोल करण्यात आले. बॉलीवूडमधील काही प्रसिध्द चित्रपटांमधील संवाद, त्यातील कलाकांरांच्या नावाने, तिच्यावर टीका केली.  एनसीबीला मिळालेल्या माहितीच्या आधारे खार दांडा येथे छापा टाकून 21 वर्षीय संशयित वितरकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एलएसडीचे 15 ब्लॉट्स, 40 ग्रॅम गांजा आणि नाट्राझेपम  सापडले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT