bholaa, bholaa movie, ajay devgan, tabu, bholaa box office Esakal
मनोरंजन

Bholaa Box Office Day 1 collection: अजय देवगणचा भोला बॉक्स ऑफिसवर कसा? हिट की गेला डब्यात?

Vaishali Patil

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. त्यामुळे आता त्याच्या भोला या चित्रपटाकडूनही प्रेक्षकांना खुप अपेक्षा होत्या. रामनवमीच्या मुहूर्तावर 'भोला' या अॅक्शन-थ्रिलर काल थिएटरमध्ये रिलिज झाला.

'भोला' बनलेल्या अजय देवगणच्या अभिनयापासून ते दिग्दर्शनापर्यंत त्याचे खूप कौतुक होत आहे. समीक्षकांनी या चित्रपटाचे भरपूर कौतुक केले आहे, तर सोशल मीडियावर लोकांनी 'भोला'ला फुल पैसा वसूल चित्रपट म्हटले आहे.

रिलीजपूर्वीच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. पहिल्या दिवशी 'भोला'साठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसाच्या कमाईचेही आकडेही आता समोर आले आहेत.

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार 'भोला'ने पहिल्याच दिवशी 11.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. तरी बजेटच्या तुलनेत हे चांगले कलेक्शन चांगले नाही. 'भोला'ने पहिल्याच दिवशी सरासरी कमाई केली आहे. असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

'भोला' हा चित्रपट जवळपास 125 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. बजेटचा विचार करता 'भोला'ला पहिल्याच दिवशी कमाई चांगली नाही.

पहिल्या दिवशी बंपर कमाई करणाऱ्या अजय देवगणच्या इतर चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनबद्दल बोललं तर 'भोला' खालच्या स्तरावर आहे. 'दृश्यम 2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 15.38 कोटी रुपयांची कमाई केली होती.

हे फक्त पहिल्या दिवसाचे कलेक्शन असल्याने चित्रपट हिट की फ्लॉप हे सांगणे कठिण आहे. तरी समिक्षक आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेनुसार या चित्रपट हिट असल्याचे बोलले जात आहे. वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा निर्मात्यांना आहे.

‘लोकेश युनिव्हर्स’च्या प्रसिद्ध कैथी चित्रपटाचा ‘भोला’ हा अधिकृत रिमेक आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT