bholaa, bholaa review, ajay devgan, tabu, bholaa box office SAKAL
मनोरंजन

Bholaa Review: अजय भाऊंनी पुन्हा मन जिंकलं..! उत्कृष्ट अभिनय आणि दमदार अ‍ॅक्शनचा तडका म्हणजे 'भोला'

हा सिनेमा आज ३० मार्चला रामनवमी निमित्त रिलीज झाला आहे

Devendra Jadhav

Bholaa Movie Review: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचे चाहते त्याच्या आगामी भोला या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. भोला हा सिनेमा तामिळ सुपरहिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही असणार आहेत. हा सिनेमा आज ३० मार्चला रामनवमी निमित्त रिलीज झाला आहे. बघूया कसा आहे भोला

(bholaa movie review starring ajay devgan, tabu)

काय आहे सिनेमात खास?

भोला हा सिनेमा 3D मध्ये सुद्धा रिलीज झालाय. 3D मध्ये भोला पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे. सिनेमातली अ‍ॅक्शन, फाईट सीन्स, स्टंट्स अशा अनेक गोष्टी थरारक बॅकग्राऊंड संगीतामुळे आणखी रंगतदार होतात.

या सर्व गोष्टी 3D मध्ये बघणं हा एक कमाल अनुभव आहे. अजयने दिग्दर्शनात सुद्धा बाजी मारली आहे. रिमेक असला तरीही भोला बऱ्याच अंशी वेगळा सिनेमा आहे

कलाकारांचा अभिनय कसा आहे?

अजय देवगणने मुख्य भूमिकेत दमदार अभिनय केलाय. अभिनय, अ‍ॅक्शन, मारधाड अशा सर्वच गोष्टींमध्ये अजय देवगण छाप पाडतो. अजय देवगणच्या तोडीस तोड तब्बू डायना सिंगच्या भूमिकेत उभी राहिली आहे.

दृश्यम नंतर या अजय आणि तब्बू या दोघांची पडद्यावरील ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघणं सुखद अनुभव आहे.

इतर कलाकारांच्या भूमिकेत दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव यांनीही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारल्या आहेत.

एकूणच भोला सिनेमाचा थिएटरमध्ये अनुभव घेतल्यास तुम्हाला मजा येईल. तुम्ही जर कैथी हा मूळ सिनेमा पाहिला असेल तर काही गोष्टींमध्ये तुमचा रसभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पण जर तुम्ही मूळ सिनेमा न पाहता भोला बघितला तर तुमचं एंटरटेनमेंट नक्की होईल याची खात्री. अजय देवगण - तब्बू यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर कमाल करते. नक्की अनुभव घ्या जमल्यास 3D मध्ये..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT