Bhumika chawla Open up On Jab we Met Movie Esakal
मनोरंजन

Jab We Met सिनेमातून रातोरात झालेला भूमिका चावलाचा पत्ता कट.. अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली,'हे करीना-शाहिद तर..'

भूमिका चावलानं एका मुलाखतीत 'जब वी मेट' आपण साइन केला होता,तेव्हा हिरो आणि सिनेमाचं नावही वेगळं होतं असं सांगितल्यानं सगळेच हैराण झालेयत.

प्रणाली मोरे

Jab We Met: २००७ मध्ये रिलीज झालेला शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा 'जब वी मेट' हा सिनेमा बॉलीवूडच्या सगळ्यात दर्जेदार आणि सुंदर चित्रपटांपैकी एक आहे. या सिनेमाला लोकांनी खूप पसंत केलं होतं. पण अनेकांना माहित नसेल कदाचित की करीना आणि शाहिद या सिनेमासाठी पहिली पसंती नव्हतेच मुळी. तर या सिनेमासाठी पहिली पसंत होती भूमिका चावला.

भूमिका चावलानं सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून कमबॅक केलं आहे. भूमिकानं एका मुलाखतीत एक खुलासा केला आहे की रातोरात तिच्या जागी करीनाला घेण्यात आलं आणि तिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यावेळी तिला खूप वाईट वाटलं होतं. भूमिकानं हातातून गेलेल्या या सिनेमाविषयीच्या आपल्या भावना एका चॅट शो मध्ये बोलून दाखवल्या आहेत.(Bhumika chawla opens up on jab we met movie that she already signed that movie.. read inside story)

त्या चॅट शो मध्ये भूमिकाला तिच्या करिअरशी संबंधित दोन आठवणीतल्या गोष्टी शेअर करण्यासाठी सांगण्यात आलं.. ज्याचं उत्तर देतानं अभिनेत्रीनं इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' सिनेमाचा भाग बनता बनता आपण राहिलो याचा उल्लेख केला. भूमिका म्हणाली की तिनं ऑलरेडी या सिनेमाला साइन केलं होतं,ज्यात तिच्यासोबत बॉबी देओल असणार होता. भूमिका पुढे म्हणाली,''जब वी मेट सिनेमात मी होते आधी,करिना नव्हती..तर सिनेमाचं टायटल 'जब वी मेट' असं नव्हतं तर 'ट्रेन' होतं''.

भूमिका पुढे म्हणाली की, ''जेव्हा प्रॉडक्शन हाऊस बदललं तेव्हा भूमिकासोबत शाहिद कपूरला कास्ट केलं गेलं. त्यानंतर आयेशा टाकियाला भूमिकाच्या जागी रिप्लेस करण्यात आलं. पण तिथेही गोष्टी जुळून आल्या नाहीत. त्यानंतर मेकर्सनी शेवटी जाऊन करीना कपूर आणि शाहिद कपूर या नावांवर शिक्कामोर्तब केलं''.

भूमिका म्हणाली की, ''या सिनेमासाठी तिनं आपलं एक वर्ष वाट पाहण्यात घालवलं,तिनं कोणता दुसरा सिनेमा साइन केला नाही. इंडस्ट्रीत अशा रातोरात गोष्टी बदलतात,पण ठीक आहे..हे चालूच राहतं''.

भूमिका म्हणाली,''मला 'जब वी मेट' हातातून गेला याचं दुःख झालं होतं पण मी लवकरच या गोष्टीतून बाहेर आली''.

भूमिकानं त्यानंतर 'लगे रहो मुन्नाभाई', मणिरत्नमचा 'Kannathil Muthamittal' हे सिनेमे साइन केले पण या सिनेमानी तिला फार काही यश दिलं नाहा. 'तेरे नाम'च्या यशानंतर आपल्याला खूप चांगल्या ऑफर्स मिळाल्या असं भूमिका म्हणाली. पण ती प्रोजेक्टविषयी कायम सिलेक्टिव्ह राहिलीय असं देखील तिनं नमूद केलं.

या मुलाखतीत भूमिकानं असं देखील सांगितलं की,''आजच्या काळातही कमर्शियल मास सिनेमांसाठी अभिनेत्रींचे रोल टिपिकल ठरलेले दिसतात. हिरो आजही हिरोच आहे आणि त्यामुळे अभिनेत्री खूप मागे राहतात. इंडस्ट्रूीत बदलाची गरज आहे. प्रेक्षक ही गोष्ट घडवून नाही आणू शकत, जर आपण हा बदल केला तर प्रेक्षक नक्कीच तो स्विकारतील. आपण बदलच केला नाही तर ते स्विकारतील तरी कसा''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT