bhumika chawla  Sakal
मनोरंजन

Bhumika Chawla: ही चूक झाली नसती तर बाजीराव मस्तानीमध्ये दिसली असती भूमिका चावला, अभिनेत्रीने केला खुलासा

अलीकडेच अभिनेत्री भूमिका चावलाने बाजीराव मस्तानीबाबत अनेक खुलासे केले आहेत.

Aishwarya Musale

Bollywood News : सलमान खान स्टारर 'तेरे नाम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भूमिका चावला नुकतीच 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमानसोबत दिसली आहे. या चित्रपटात तिने पूजा हेगडेच्या वहिनीची भूमिका साकारली आहे.

आता भूमिकाने नुकतेच जब वी मेटमध्ये करीना कपूर खानच्या जागी ती असली असती याचा धक्कादायक खुलासा केला आहे. यासोबतच संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानी या हिट चित्रपटातही ती काम करणार होती, असा खुलासा तिने केला आहे.

बाजीराव मस्तानी 2015 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र, संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या आयकॉनिक चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेपासूनच हा चित्रपट करण्याचा विचार केला होता.

सलमान आणि शाहरुख खानसोबत हा चित्रपट बनवायचा होता पण तसे होऊ शकले नाही, असे भन्साळींनी शेअर केले होते. आता, सिद्धार्थ कन्ननशी बोलताना भूमिकाने खुलासा केला की, तिलाही या चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. यासाठी तिने स्क्रीन टेस्टही दिली पण त्यानंतर काहीच झाले नाही.

भूमिका पुढे म्हणाली, 'बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेरे नाम नंतर लगेचच माझी स्क्रीन टेस्ट झाली होती. मी सरांसोबत त्यांच्या स्टाईलमध्ये फोटोशूट केले होते. माझ्या साडीवर तूप आणि तेल सांडले आणि माझ्या साडीला आग लागली. मी त्याच्या स्टाईल मध्ये दिवे धरले होते आणि मग ते पडले. त्यावेळी मी सिल्कची साडी नेसली होती. काय झाले ते मला आठवते.'

याच मुलाखतीत भूमिकाने खुलासा केला की, 'जब वी मेट'मध्ये करीनाने तिची जागा घेतली होती, त्यानंतर तिला खूप वाईट वाटले होते. तिला मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफरही आली होती. जरी नंतर ग्रेसी सिंग या चित्रपटात दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT