Urfi Javed Team eSakal
मनोरंजन

उर्फीच्या ड्रेसला म्हटलात मच्छरदाणी, त्याची किंमत पाहून...

Urfi Javed अनेकदा तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल होत असते.

सकाळ वृत्तसेवा

उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होत असते. मात्र सध्या चर्चा सुरू आहे ती लेटेस्ट 3D निळ्या टॉपची. काही दिवसांपूर्वीच तिच्या एका निळ्या रंगाच्या टॉपला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. जाळीसारख्या डिझाईनच्या या ड्रेसला नेटकऱ्यांनी मच्छरदाणी म्हटलं होतं. बीग बॉस फेम उर्फी स्वत: तिच्या कपड्याचं डिझाईन करत असते, तर कधी कधी ती कॉपी सुद्धा करत असते.

उर्फीच्या ज्या टॉपची सध्या चर्चा होतेय, तो मात्र कॉपी केलेला नाही. हा टॉप थोडा-थोडका नाही तर तब्बल ७००० रुपयांचा आहे. हा टॉप विशेष माप घेऊन बनवण्यात आला आहे. उर्फीसाठी हा खास टॉप डिझायनर सिमरन मेरवाहने बनवला आहे. या टॉपची एक वेगळी गोष्ट म्हणजे याला व्हाईट नेटद्वारे थ्रीडी लूक देण्यात आला आहे. विशेष म्हणदे या ड्रेसची कलर स्कीम सुद्धा सुंदर आहे. मात्र निळ्या टॉपवर पांढऱ्या रंगाचं जाळीसारखं डिझाईन जरा वेगळं दिसतं. डिझायनरच्या मते, या टॉपला 3D टॉप म्हणता येईल. उर्फीला या डिझायनर टॉपबद्दल खूप ट्रोल देखील केले आहे.

आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे बर्‍याचदा उर्फी ट्रोल होते. पण तिचे अनेक ड्रेस सुंदर डिझाईनचे असतात. उर्फी अशा बर्‍याच ड्रेसेसमध्ये जबरदस्त दिसते. तर काही कपड्यांसाठी ट्रोलींगचा सामना करावा लागतो. पण उर्फीला या सगळ्या ट्रोलींगची अजिबात पर्वा नसल्याचं दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT