Big Boss Marathi 4: Chat between tejaswini and kiran mane, Nomination  Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: मोठ्या आशेनं किरण मानेंकडे गेली तेजस्विनी,पण मानेंनी घातली अट, म्हणाले...

बिग बॉसच्या घरात आता 'फटा पोश्टर निकला झिरो' नॉमिनेशन कार्य पार पडणार असल्यानं सदस्य आता एकमेकांमधील मैत्रीचाही विचार करताना दिसत नाहीत.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिये दरम्यान आता किरण माने अटींचे राजकारण खेळू लागल्याचं दिसून येत आहेत. घरात आता 'फटा पोश्टर निकला झिरो' नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये किरण माने आणि तेजस्विनी मध्ये चर्चा होताना दिसणार आहे, कारण तेजस्विनीला स्वतःला नॉमिनेशन पासून वाचण्यासाठी किरण मानेंना गळ घालायची आहे. तिच्या नावाची पाटी किरण मानेंकडे आहे. आणि तिला नॉमिनेट करणं ,न करणं किरण मानेंच्याच हातात आहे. पण त्यांनी आता तिच्यासमोर एक अट ठेवली आहे. (Big Boss Marathi 4: Chat between tejaswini and kiran mane, Nomination)

सुरुवातीला किरण माने तेजस्विनीला म्हणतात, ''योगेशने जर प्रसादला नॉमिनेट केलं तर मी विकासला वाचवेन असं मी त्याला सांगितलं आहे. मी विकासला सांगितलं आहे, माझ्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर मी त्याला देखील नॉमिनेट करण्यापासून वाचवणार नाही... तिथे मित्र नाही कि कोणी नाही…तो आता माझ्यासाठी झटतो आहे. आणि हे पूर्ण नाही झालं तर विकास नॉमिनेट झाला तरी मला हरकत नाही”. आता विकासच्या नावाची पाटी तेजस्विनीकडे आहे. म्हणजे तेजस्विनीला नॉमिनेट न करुन विकासला वाचवणं हे देखील किरण मानेंच्याच हातात आहे.

तेजस्विनी तिची बाजू मांडत म्हणताना दिसणार आहे, "माझं तुमच्याशी असं काही वैयक्तिक नाहीये. योगेशने प्रसादला नॉमिनेट करावं हे वेगळे आहे... जर तुम्ही तसं नाही केलं तर मला विकासाला नाईलाजाने नॉमिनेट करावं लागेल”. त्यावर किरण माने म्हणाले, "पण हीच माझी डील आहे." आता किरण यांच्या डीलमुळे विकास नॉमिनेट होईल ? कि तेजस्विनी योगेशला सांगून प्रसादला नॉमिनेट करवेल. बघूया या सगळ्या प्रक्रियेत कोण नॉमिनेट होईल ? आणि कोण सेफ होईल ? किरण आणि विकास यांच्या मैत्रीत दुरावा येईल का? सगळं पाहणं इंट्रेस्टिंग असेल.

हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठी वाहिनीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT