Big Boss Marathi 4, Kiran Mane ,megha ghadge clashes, prasad and akshay fight for bag. Google
मनोरंजन

Big Boss Marathi 4: एका बॅगेसाठी सदस्य उठले एकमेकांच्या जीवावर, हाणामारीनं रंगला दिवस

बिग बॉस मराठीच्या घरात रोज एका नवीन मुद्द्यावरनं सदस्य आपापसात भिडताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Big Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात दिवसागणिक आता वादांची संख्या वाढताना दिसत आहे. रोज एका नवीन मुद्द्यावरनं इथे सदस्य आपापसात भिडताना दिसत आहेत. आता तर बिग बॉस मराठीच्या घरात BB विमानतळ बनलं आहे कुस्तीचा आखाडा. इथं साध्या बॅगवरनही सदस्य एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

त्याचं झालं असं की, मेघा घाडगेनं विरोधी टीमवर आरोप करत म्हटलं, ''खाली दोन दोन बॅग धरून ठेवल्या आहेत ते दिसत नाहीये''. त्यावर किरण माने ठसक्यात म्हणाले "मी बघितलं आहे, कॅमेराने देखील बघितलं आहे. बॅगा अशा वाटलेल्या आहेत क्लिअर दिसतं आहे आणि आम्हाला काय सांगत आहात. कॅमेरा बघतो आहे, लाज बाळगा...'' बस्स.. यावरनंच पुढे सगळ रामायण घडलं ते बिग बॉसच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये पहायला मिळालेच असेल आपल्याला.

तर दुसरीकडे बॅगेवरुन प्रसाद आणि अक्षयनं घराला कुस्तीचा आखाडाच बनवला, त्या वादात समृद्धी मध्ये पडली अन् तिनं अक्षयची बाजू घेतली. तिचं म्हणणं आहे की अक्षयने सर्वात आधी बॅग ताब्यात घेतली आहे.

घरातील काही सदस्य देखील प्रसादला सांगत होते की, 'बॅग सोडून दे'. पण दोघेही बॅग सोडायला तयार नव्हते. इकडे ही हाणामारी सुरू असताना तिकडे तेजस्विनी-रुचिराचं आणखी वेगळंच काहीतरी चालू होतं. तेजस्विनीचे रुचिराला म्हटलं,''तू manipulate का करतेस ?'' आता रुचिराने आपली बाजू कशी मांडली आपण पाहिलं असेलच. कोणाची बॅग कोणी घेतली यावरून सदस्य एकमेकांशी भिडलेयत,तर इतर सदस्यांचे आणखी वेगळेच वादाचे मुद्दे आहेत त्यामुळे हा नवीन भाग प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT