Big Boss Marathi 4, Tejaswini Lonari discuss with her team. Google
मनोरंजन

Big Boss 4: 'मेघा घाडगे बाहेर पडली आता पुढचं टार्गेट...',तेजस्विनीनं नावच जाहीर केलं

मेघा घाडगे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडणारी दुसरी सदस्य,पण आता यामुळे घरातील सूत्र बदलताना दिसणार आहेत.

प्रणाली मोरे

Big Boss 4: बिग बॉस मराठीच्या घरातून नुकतीच मेघा घाडगे घराच्या बाहेर पडली असल्यानं आता घरातील सूत्र हळूहळू बदलू लागलीयत. मेघाचा ग्रुप आता आपली माणसं कमी होऊ लागल्यानं नवनवीन स्ट्रॅटेजी आखताना दिसत आहेत. त्यामुळे आता तेजस्विनीनं आपल्या ग्रुपला याबाबतीत हुशारीनं वागायचा सल्ला दिला आहे. मात्र हा सल्ला देताना तिनं घरातल्या दोन सदस्यांना नकळत टोला लगावला आहे. काय म्हणाली आहे तेजस्विनी? चला जाणून घेऊया सविस्तर.(Big Boss Marathi 4, Tejaswini Lonari discuss with her team.)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तेजस्विनीचा ग्रुप आज दुसऱ्या ग्रुपबद्दल चर्चा करताना दिसणार आहे. ज्यामध्ये तेजस्विनी तिच्या टीमला सावध करणार आहे. काल मेघा घाडगेला घराबाहेर पडावे लागले आणि त्यामुळे घरातील दुसऱ्या ग्रुपची समीकरणं तेजस्विनीला बदलताना दिसत आहेत, ज्याबद्दल ती ग्रुपला सल्ला देणार आहे. विशेषतः योगेशला.

मेघा घाडगे घरातून बाहेर पडली याचा संदर्भ देत तेजस्विनी म्हणताना दिसेल की, ''काल जे झालं त्यानंतर लगेच सगळे नीट बोलत आहेत. मला काही प्रॉब्लेम नाही, मी तर तशीही पहिल्या दिवसापासून सगळ्यांशी नीटच बोलते आहे इथे माझी लॉयल्टी मी दाखवली आहे. ते नीट बोलले तरी भारावून जाऊ नका. फक्त काळजी घ्या, त्यांची ताकद कमी होतं आहे म्हणून त्यांना आता लोकं पण हवी आहेत. त्यांच्या ग्रुपमध्ये बसायला, टवाळक्या करायला. त्यात तुझा नंबर पहिला आहे (योगेश) emotionally भारावून जाण्यात तू पहिला येतोस''. हे असं बोलून एकार्थानं तेजस्विनी योगेशला मेघा घाडगे नंतर स्वतःला घराबाहेर जाण्यासाठी टार्गेट करून घेऊ नकोस असा नकळत सल्ला देताना दिसेल.

अमृता धोंगडे यावर म्हणताना दिसेल, 'त्या दोघांचे (किरण आणि विकास) म्हणणे आहे प्रसादसाठी त्यांनी आपल्याशी वैर घेतले'. पण यावर तेजस्विनी किरण माने आणि विकासला टोला लगावत म्हणताना दिसणार आहे, या दोघांचे काहीच होणार नाही ते तसेच राहणार आहेत. मेघा घाडगे घरातून बाहेर पडल्यावर घरातील सदस्यांच्या वागणुकीत मोठे बदल होताना दिसून येणार,आणि त्यामुळे आजचा एपिसोड बदलेल्या सूत्रांची,व्यूहरचनेची झलक दाखवणारा ठरला असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT