Big Trouble With Riteish Deshmukh & Genelia D'Souza Movie ‘Mister Mummy’ Google
मनोरंजन

Riteish Deshmukh आणि जेनेलियाचा 'मिस्टर मम्मी' अडचणीत, स्क्रिप्ट चोरल्याचा होतोय आरोप

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा त्यांच्या 'मिस्टर मम्मी' या चित्रपटातून अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

प्रणाली मोरे

Riteish Deshmukh & Genelia D'Souza Movie ‘Mister Mummy: बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा त्यांच्या 'मिस्टर मम्मी' या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांच्या या कॉमेडी ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण रिलीज होण्याआधीच चित्रपट अडचणीत आला आहे. (Big Trouble With Riteish Deshmukh & Genelia D'Souza Movie ‘Mister Mummy)

कोलकात्याचे निर्माते आकाश चॅटर्जी यांनी 'मिस्टर ममी'च्या निर्मात्यांवर त्यांच्या चित्रपटाची कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप केला आहे. आकाशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

आकाश चॅटर्जी प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांचा मुलगा आहे. आकाश चॅटर्जीने 'मिस्टर ममी'च्या निर्मात्यावर चोरीचा आरोप लावला आहे. शाद अली दिग्दर्शित "मिस्टर मम्मी" ची कथा चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत शेअर केलेल्या स्क्रिप्टमधून कॉपी करण्यात आली आहे, असा आरोप आकाशने त्याच्या फेसबुक अकाउंटवर अनेक स्क्रीनशॉट शेअर करत केला आहे.

Big Trouble With Riteish Deshmukh & Genelia D'Souza Movie ‘Mister Mummy’

आकाश चॅटर्जीने दावा केला आहे की त्याने 2019 मध्ये चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली होती. ही कथा एका तरुणाची आहे ज्याला रहस्यमयरित्या गर्भधारणा होते. आकाशने ही गोष्ट त्यावेळी 'मिस्टर मम्मी'च्या निर्मात्यांसोबत शेअर केली होती आणि ते खूप प्रभावित झाले होते. आकाशने त्याच्या कथेचे शीर्षक "विकी पेट से" असे ठेवले होते आणि आयुष्मान खुरानाला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे ठरले होते. मात्र त्यानंतर निर्मात्याकडून पुढे कोणताही पुढाकार घेण्यात आला नाही. आता, रितेश आणि जेनेलिया यांच्या 'मिस्टर मम्मी' चा ट्रेलर पाहिल्यानंतर, त्याला समजले की रितेशच्या 'मिस्टर मम्मी'ची स्क्रीप्ट तीन वर्षांपूर्वी त्याने लिहिलेल्या स्क्रिप्टशी खूप साम्य ठेवून आहे आणि त्त्यामुळेच त्याने दावा केला की चित्रपटाची कथा चोरी केली गेली आहे.

आकाश यांनी म्हटले की त्याने "विकी पेट से" ची स्क्रिप्ट-पटकथा लिहिली आहे. आणि आता कायदेशीर कारवाई करण्याचा विचार तो करत आहे. आकाशचे म्हणणे आहे की,''मला पैसे नकोत पण माझे नाव 'मिस्टर मम्मी'शी जोडायला हवं, मला कथेचं क्रेडिट द्यायला हवं''. शाद अली दिग्दर्शित मिस्टर मम्मी 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT