rahul vaidya news  
मनोरंजन

'राहुलच्या लग्नाला यायचं हं, आमचं ठरलयं'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनमध्ये राहूल वैद्यच्या अफेअरची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. सोशल मीडियावर त्याच्या या गोष्टीचा बराच बोलबाला झाला होता. दिशा परमारसोबत त्याचे नाव जोडले गेले होते. शो मध्येच त्यानं तिला प्रपोज  केलं होतं. त्यांची लव स्टोरी सर्वांच्या चर्चेचा विषय झाली होती. बिग बॉसमधील संभाव्य विजेता म्हणून राहूलचे नाव घेतले जात होते. आता त्याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. बिग बॉस नंतर राहूलनं एका जंगी पार्टीचे आयोजन केले असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. आता त्यात राहूलच्या लग्नाची भर पडणार आहे.

भलेही राहूल बिग बॉसच्या स्पर्धेत जिंकला नसेल मात्र त्यानं आपल्या स्वभावानं सर्वांची मने जिंकली होती. त्यामुळे त्याची लोकप्रियता वाढली होती. आता असे म्हटले जात आहे की, त्याच्या अवतीभोवती चाहत्यांचा गराडा पडत आहे. त्यात त्याच्या लग्नाची चर्चा रंगली असून येत्या काही महिन्यात त्याचे दोनाचे चार हात होणार आहे. शो मध्ये त्यानं दिशाला प्रपोज केलं होतं. त्यामुळे तो भलताच लोकप्रिय झाला होता. राहूलच्या घरच्यांनी त्याला परवानगी दिल्याचे कळते आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईनचं लग्नाबद्दल भाष्य केले होते. ज्यावेळी त्या फॅमिली वीकच्या दरम्यान बिग बॉसच्या घरात आल्या होत्या तेव्हा त्यांनी त्याबद्दल सांगितले होते.

एका मुलाखतीच्या दरम्यान राहुलनं सांगितले होते की, तीन ते चार महिन्यात त्याचे लग्न होणार आहे. राहुल जेव्हा बिग बॉसमध्ये होता तेव्हा अशी चर्चा होती की तो जुनमध्ये लग्न करणार आहे. अजुनपर्यत लग्नाची तारीख पक्की झाली नसून ते लग्न काही निवडक व्यक्तींच्या उपस्थित व्हावे अशी राहूलची इच्छा आहे. तसेच त्यानं बॉलीवूडमधील व्यक्तींसाठी एका रिसेप्शन पार्टीचेही आयोजन केल्याची माहिती आहे.

राहुलशिवाय दिशानं एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा राहुलनं बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होतो. शो च्या सुरुवातीला राहुलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. जेव्हा राहूलनं मला प्रपोज केलं होतं तेव्हा आश्चर्यचकित झाले होते. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Government Investment: PPF, SSY की SCSS? तुमच्यासाठी कोणती सरकारी बचत योजना फायद्याची?

तब्बल ९ World Cup ट्रॉफी अन् T20I मध्ये १६ प्लेअर ऑफ द मॅच... स्टार अष्टपैलूने इतिहास घडवत रचना नवा विश्वविक्रम

Latest Marathi News Live Update: पुणे-नाशिक रस्ता पाण्याखाली

Pune Passport Helpdesk: पासपोर्ट अर्जदारांसाठी प्रादेशिक कार्यालयात ८ तारखेला जनसंवाद सत्र; तक्रारी व शंका निवारणाची संधी

आमिर खानने लग्नात चांदीचं पैंजण का घातलेलं? व्हिडिओ पाहून नेटकरी चकीत, म्हणतात-

SCROLL FOR NEXT