bigg boss 14 jan 13 episode rakhi sawant and abhinav shukla fun continues 
मनोरंजन

'राखी सटकली, चक्क अभिनव शुक्लाच्या नावानं लावलं कुंकू'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉस मध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. वाद, भांडणे, शिवीगाळ, आरोप - प्रत्यारोप यामुळे हा शो कायम वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसून आले आहे. बिग बॉसचा 14 वा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातील एक स्पर्धक राखी सावंत भलतीच चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच धक्कादायक आहे.

बिग बॉस च्या 14  व्या सीझनमध्ये जॅस्मिन भसीन आणि अभिनव शुक्ला. रुबीना दिलेक आणि एजाज खान यांची अंतिम स्पर्धकाच्या यादीत निवड झाली आहे. त्यानंतर निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि अली गोनी यांची बिग बॉ़सच्या घरात इंट्री झाली आहे. 13 जानेवारीचा शो हा खास ठरला होता. त्यात राखी सावंत हिनं सर्वांचे मनोरंजन केले होते. त्यात विकास गुप्ता हा प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर पडला आहे. त्यामुळे घरातील इतर सर्व सदस्य हे चिंतेत होते. त्यांच्यात थोडे भीतीचे वातावरण होते. यासगळ्यात चर्चा झाली ती राखी सावंतची तिनं चक्क अभिनव शुक्लाच्या नावानं 'एक चुटकी सिंदूर की किमत' चा सीन करुन सर्वांना धक्का दिला.

राखी सावंतचा तो सीन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. बुधवारचा बिग बॉसचा एपिसोड हा विशेष लोकप्रिय झाला आहे. राखीनं हातात दुर्बिण घेऊन प्रेमाचा शोध घेताना दिसून आली आहे. त्यावेळी तिची आणि अभिनव शुक्ला यांच्यातील मस्तीही चाहत्यांना आवडली असल्यानं त्या दोघांच्याही सोशल अकाऊंटवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे. राखी ही अभिनवच्या नावानं भांगेत कुंकू लावत असून त्यावेळी विकास गुप्तानं एका ठिकाणी कॅमेरा लपवून ठेवला होता. अली गोनी अर्शी खानला म्हणतो की, मला सोनालीच्या भावनांविषयी आदर आहे. आता त्यावर अधिक चर्चा नको. अर्शी ही सोनाली आणि अलीमध्ये मैत्रीचे नाते तयार व्हावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. 

या अगोदर अर्शी खान आणि राखी सावंत यांच्यात 'लाश का कफन' वरुन बोलणं झालं होतं. त्यानंतर राखी सावंतची एजाज खान बरोबर वादावादी झाल्यानं ती रडायला लागते. एवढेच नव्हे तर एजाज खान, राहूल वैद्य यांची रुबीनाशी भांडणे होतात. असे त्या एपिसोडमध्ये दाखविण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Book Festival: पुस्तक महोत्सवात ५० कोटींची उलाढाल; ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकांची विक्री, साडेबारा लाख नागरिकांनी दिली भेट

Pune Accident: 'अक्कलकोटचे मायलेक रेल्वेच्या धडकेत ठार'; पिंपरी-चिंचवडमधील घटना, अंत्यविधीसाठी गावी गेले अन्..

Maharashtra Cold Wave : पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भात थंडीचा कडाका वाढणार, किमान तापमान ८.६ अंशांवर; हवामान विभागाचा अंदाज समोर

‘परफेक्ट लूक’चा अट्टहास; देशात सौंदर्योपचारांची झपाट्याने वाढ, वर्षभरात १२.८८ लाख प्रक्रिया

Latest Marathi News Live Update : कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट 'डॉ. कृष्णा' पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT