bigg boss 14 rakhi Sawant tries to pull Abhinav Shukla pants down rubina angry 
मनोरंजन

राखीनं लिमिट क्रॉस केलं; अभिनवची काढली पँट 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसमध्ये सध्या राखीनं सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत. ती वाट्टेल तसे वागताना दिसत आहे. तिला कुणी काहीही सांगितलं तरी ते न ऐकता प्रसिध्दीसाठी अशोभनीय वर्तन ती करताना दिसत आहे. यावरुन तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळत असून अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. एक दोन दिवसांपूर्वी राखीनं बिग बॉसच्या घरात असणा-या गार्डनमध्ये अंघोळ केली होती. अभिनवप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी अंगावर आय लव यु असे लिहिले होते. तिच्या अशा वागण्यानं बिग बॉसची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी तिला अनेकदा समजही दिली आहे. मात्र राखीच्या वागण्यात काही फरक पडलेला दिसत नाही.

 राखीनं असं काही केलं की त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. तिनं तिचा सहस्पर्धक अभिनवची पँट काढण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन तिला रुबीनाने चांगलेच धारेवर धरले होते. मात्र राखीनं तिला कुठलीच दाद दिली नाही. राखीनं गार्डनमध्ये फिरणा-या अभिनवच्या शॉर्टसची लेस खाली ओढली. बिग बॉसचा 14 वा सीझन वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आला आहे. त्यात राखीच्या करामती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राखीनं अभिनवला प्रपोझ करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. अंगावर आय लव यु लिहून त्याला इंप्रेस करण्याचा प्रयत्न केला होता. तर कधी त्याच्या नावानं कुंकूही लावले होते.

बिग बॉसच्या आगामी एका भागामध्ये राखीनं अभिनवची पँट काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यात राखी अभिनवच्या पाठीमागे लागल्याचे दिसुन येत आहे. राखीचा पळण्याचा प्रयत्न यावेळी अयशस्वी झाला आहे. मात्र तिच्या याप्रकारच्या कृतीमुळे तिनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुढील भागामध्ये असे दाखविण्यात आले आहे की, अभिनव गार्डनमध्ये फिरताना दिसतो आहे. त्यावेळी राखीनं लिमिट क्रॉस केल्याचे पाहवयास मिळते. ती अभिनवच्या शॉर्टसची लेस ओढते. राखीनं जे काही केलं त्यावरुन रुबीनाला खूप राग आला आहे. ती राखीला लिमिटमध्ये राहा असे सांगत आहे. हे दाखवणारा प्रोमो सोशल मीडियावर शेयर करण्यात आला आहे.

रुबीना म्हणते की, राखी तुझ्या मर्यादेत राहा. त्याचे उल्लंघन करु नको. रुबीनाला राखीचा प्रचंड राग आला असून त्यामुळे ती राखीला धारेवर धरत आहे. त्यावेळी राखी आणि रुबीना यांच्यात वाद होताना दिसत आहे. राखी रुबीनाला म्हणते की, अभिनव रियल लाईफमध्ये माझा पती होणार आहे. मला जे योग्य वाटते ते मी करणार असे राखी रुबीनाला बजावते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT