Abdu Rozik to leave bigg boss house before grand finale for this reason Google
मनोरंजन

Bigg Boss 16: अरे चाललंय काय! आधी काढलं..मग परत आणलं आणि आता.., अब्दू फिनाले आधीच का सोडून चालला शो?

संभाव्य विजेता म्हणून अब्दूला पाहिलं जात असताना शो मधून त्यानं स्वतःहून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय संभ्रमात टाकणारा आहे.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16: बिग बॉसच्या चाहत्यांसाठी सध्या एक शॉकिंग बातमी आहे. कानावर पडतंय की शो मधील सगळ्यांचा आवडता स्पर्धक अब्दू रोझिक लवकरच म्हणे शो ला टाटा-बायबाय करणार आहे. आता अब्दू रोझिकचे चाहते मात्र यानं शॉक झाले असणार हे नक्की.

अर्थात ही बातमी किती खरी आहे याविषयी काही कळालेलं नाही. पण बिग बॉस फॅन क्लब पेजवर अब्दू बिग बॉसला गूड बाय बोलणार ही बातमी अक्षरशः आग लागल्यासारखी पसरली आहे. (Abdu Rozik to leave bigg boss house before grand finale for this reason)

फॅनक्लबवर दावा केला गेला आहे की अब्दू रोझिक १२ जानेवारी रोजी बिग बॉस शो सोडणार आहे. आणि हा निर्णय त्यानं आपल्या काही कामा संदर्भातल्या कमिटमेंटमुळे घेतला आहे. बिग बॉस हिंदी शो चा कालावधी वाढवल्यानं ही अडचण आता अब्दूसमोर उभी राहिली आहे.

आता अब्दू रोझिक शो मधून बाहेर पडेल ते पुन्हा न येण्यासाठी. अब्दूला बिग बॉसमधून घेऊन जाण्यासाठी कुणीतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे असं देखील बोललं जात आहे. आणि त्यानंतर अब्दूचा बिग बॉसमधील स्वप्नांचा प्रवास थांबणार आहे.

आता अब्दू रोझिकच्या चाहत्यांना ही बातमी ऐकून धक्का पोहोचणार यात शंका नाही. पण अब्दूचं यश आणि स्टारडम पाहून चाहते खूश आहेत.

१९ वर्षाचा अब्दू रोझिक हा इंटरनॅशनल स्टार बनला आहे. तजाकिस्तानचा हा सिंगर वर्ल्ड फेमस बनला आहे. अब्दू रोझिक जेव्हापासून बिग बॉस १६ चा भाग बनला आहे तेव्हापासून तर भारतात त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

त्याच्या क्युटनेसवर मुली तर जीव ओवाळून टाकतात. वयाच्या १९ व्या वर्षी अब्दू रोझिक मधील समजूतदारपणा सगळ्यांनाच भावला आहे. जर का खरंच अब्दू रोझिकनं शो मधून एक्झिट घ्यायचं ठरवलं असेल तर अर्थात सगळेच त्याला मिस करणार आहेत.

बिग बॉसमध्ये अब्दू दोन वेळा कॅप्टन बनला. त्यादरम्यानं त्यानं स्वतःला सिद्ध करुन दाखवलं होतं की तो खूप चांगल्या पद्धतीनं घराला मॅनेज करू शकतो. बिग बॉसच्या घरात अब्दूची शिव ठाकरे, एमसी स्टॅन, निम्रत कौर आहलूवालिया,सुंबुल तौकीर यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली होती.

निम्रतला अब्दू पसंत करु लागला होता. पण जेव्हा त्याला कळलं की ती आधीपासूनच रिलेशन शीपमध्ये आहे तेव्हा मात्र त्यानं समजूतदारपणा दाखवत तिच्यापासून लांब राहणं पसंत केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT