Bigg Boss 16 Archana Gautam  esakal
मनोरंजन

Bigg Boss 16 : अर्चना गौतमनं बिग बॉसलाच भरला दम! 'जर का माझ्या...'

आता तर या रियॅलिटी शोमधील अर्चना गौतमनं थेट बिग बॉसलाच दम भरला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Archana Gautam Angry On Finally Makeres : टीव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय रियॅलिटी शो बिग बॉस हा आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बिग बॉसनं प्रेक्षकांचे, नेटकऱ्यांचे मनोरंजन केले आहे. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आले आहेत. आता तर या रियॅलिटी शोमधील अर्चना गौतमनं थेट बिग बॉसलाच दम भरला आहे.

दिवसेंदिवस बिग बॉसच्या खेळातील रंगत वाढताना दिसत आहे. बारा दिवसांनंतर बिग बॉसचे यंदाचे पर्व निरोप घेणार आहे. त्यामुळे शोमधील आपले स्थान टिकवण्यासाठी स्पर्धकांची चढाओढ लागली आहे. त्यावरुन वेगवेगळे खुलासेही समोर आले आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी, चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्पर्धकांना सपोर्ट करण्यास सुरुवात केली आहे.

यासगळयात यंदाच्या बिग बॉसमधील सर्वाधिक वादग्रस्त स्पर्धक अर्चना गौतम ही चर्चेत आली आहे. गेल्या सीझनमध्ये ज्याप्रमाणे राखीनं आपल्या स्वभावानं बिग बॉसमध्ये रंग भरले होते. त्याचरीतिनं आता अर्चनानं सगळ्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. यात तिनं तर बिग बॉसला देखील सोडलेलं नाही. त्यालाच धमकी देऊन स्वताच्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेण्याचे काम अर्चनानं केले आहे.

Also Read - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

बिग बॉसच्या शेवटच्या टप्प्यात स्पर्धक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. अर्चना काही दिवस शांत होती. आता मात्र ती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. तिनं निमृत कौरला चांगलेच सुनावले आहे. एका टास्कच्या दरम्यान तिचं आणि प्रियंकाचा वाद झाला. यावेळी बिग बॉसनं हस्तक्षेप केला. मात्र अर्चनानं बिग बॉसचे न ऐकता त्यालाच प्रत्युत्तर करण्यास सुरुवात केली.

अर्चनानं बिग बॉसवर जे आरोप केले ते ऐकून बिग बॉसही घाबरुन गेलं असून शेवटी त्याला देखील खुलासा करावा लागला आहे. अर्चनानं बिग बॉसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यावरुन बिग बॉसला आपली बाजू मांडावी लागली होती. अर्चना जे काही बोलली हे तिची प्रतिक्रिया आहे. त्याचा आम्ही आदर राखतो. अर्चनानं बिग बॉसमध्ये शांतता कशी राहिल याचा विचार करावा. असे म्हटले होते. जर का माझ्याविरोधात सातत्यानं बोललं जात असेल तर मी काहीच बोलायचे नाही का असा प्रश्न अर्चनानं यावेळी उपस्थित केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT