tina datta, tina datta news, tina datta, shalin bhanot. bigg boss 16 SAKAL
मनोरंजन

Tina Datta News: शालीनवरुन चिडवणाऱ्या ट्रोलर्सना टीनाने घडवली चांगलीच अद्दल, बघा काय घडलं

टीनाने तिला ट्रोल करणार्या लोकांना एका पोस्टच्या माध्यमातुन खडे बोल सुनावले आहेत.

Devendra Jadhav

Tina Datta News: बिग बॉस हिंदीचा १६ वा सिझन संपला तरीही बिग बॉस मधल्या कलाकारांची चर्चा मात्र संपत नाहीये. बिग बॉस १६ मध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे शालीन भानोत आणि टीना दत्ता.

बिग बॉस मध्ये कधी जवळीक, कधी छान मैत्री, कधी टोकाची भांडणं अशा अनेक गोष्टी टीना आणि शालीनने अनुभवल्या. अखेर बिग बॉस संपताना शालीन आणि टिना यांच्यातलं नातं संपलं.

बिग बॉस १६ जरी संपलं असलं तरीही नेटकरी टिनाला शालीनवरून चिडवत आहेत. तिला ट्रोल करत आहेत. अशातच टीनाने तिला ट्रोल करणार्या लोकांना एका पोस्टच्या माध्यमातुन खडे बोल सुनावले आहेत.

(bigg boss 16 fame Tina Datta reply to irritating people on social media for troll him shalin bhanot)

टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बिग बॉस संपल्यानंतर ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूट आणि कामाशी संबंधित पोस्ट करत असते. नुकतेच तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले.

आता टीना दत्ताने ट्रोलर आर्मीला चोख प्रत्युत्तर देऊन एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिने स्पष्टपणे सांगितले की, 'अशा क्षुल्लक गोष्टींनी त्याला काही फरक पडत नाही. जितके लोक मला पाडतील तितका मी वरती जात राहीन.'

नुकत्याच झालेल्या पोस्टमध्ये टीना दत्ताने तिच्याविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या युजर्सना चोख प्रत्युत्तर दिले.

टीना 'बिग बॉस 16' चा भाग होती आणि शोमध्ये तिची शालीन भानोतसोबतची जवळीक आणि भांडणे पाहायला मिळाली.

शो संपल्यानंतरही शालीनसोबतच्या त्याच्या नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. लोकांनी अभिनेत्रीला अनेकदा ट्रोल केले. आता पहिल्यांदाच टीनाने या ट्रोल्सना धडा शिकवला आहे.

टीना इथेच थांबली नाही. ती पुढे लिहिते, "अशा जगात जिथे तुमचा द्वेष आणि नकारात्मकता पसरवण्यात विश्वास असेल, मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जितकं जास्त मला खाली खेचण्याचा प्रयत्न कराल तितका माझी स्वप्न अधिक उंचावतील.

तुम्ही बोला, कारण मी तुम्हाला बोलण्याचा मुद्दा देण्यासाठी काहीतरी नक्कीच योग्य करत असावे.. म्हणून करते रहो, कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना!"

टीना पुढे लिहिते, "माझे प्रिय ट्रोलर्स जे बोलतात त्यावरुन मी नाही तर तुम्ही कसे आहात हे दिसतं, मी ज्या पद्धतीने तुम्हाला हाताळते ते माझे मोठेपण दर्शवते!

मी बदलणार नाही कारण थोडीशी नकारात्मकता माझ्या उत्साहावर आणि सकारात्मकतेवर परिणाम करू शकत नाही! अशी पोस्ट लिहून टीना दत्ताने ट्रॉलर्सना खडे बोल सुनावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT