shiv thakare  SAKAL
मनोरंजन

Shiv Thakare : कधीकाळी दुधाचे रतीब घालणाऱ्या, पेपर विकणाऱ्या शिवला 'नशीब' साथ देणार?

बिग बॉसचा शेवटचा टप्पा आता जवळ आला आहे. आज होणाऱ्या फिनालेमध्ये विजेत्याचं नाव घोषित केलं जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 Finalist Shiv Thakare : बिग बॉसचा शेवटचा टप्पा आता जवळ आला आहे. आज होणाऱ्या फिनालेमध्ये विजेत्याचं नाव घोषित केलं जाणार आहे. मात्र यासगळ्यात काही विजेत्यांची नावं ही चर्चेत आली आहे. त्यामध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी मराठी बिग बॉसमध्ये विजेतेपद मिळवलेल्या शिवकडून हिंदी बिग बॉसमध्ये मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत.

बिग बॉसच्या सोळाव्या सीझनमध्ये शिव ठाकरेनं आपल्या नावाची जादु कायम ठेवली आहे. त्यानं या शो मधून लाखोच्या संख्येनं चाहतावर्ग जोडला आहे. बिग बॉसच्या घरात शिवनं केलेल्या परफॉर्मनन्सनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. आता बिग बॉसच्या घरात शालिन भनोत, अर्चना गौतम, प्रियंका चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन हे स्पर्धक आहेत. यांच्यापैकी कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

यात शिवकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत, त्यानं मराठी बिग बॉसप्रमाणेच या शोमध्ये देखील विजेतेपद मिळवावं असे चाहत्यांना वाटते. बिग बॉसपर्यतचा त्याचा प्रवास मोठा खडतर असल्याचे दिसून आले आहे. शिवचा मनोरंजन क्षेत्रातील एकुणच प्रवास संघर्षमय होता. आज भलेही शिवला सारा देश ओळखत असला तरी कोणेएकेकाळी त्याला खूप कष्ट करावे लागले आहे. दुधाच्या बाटल्या घरोघरी पोहचवण्यापासून पेपर विकण्यापर्यतची कामं त्यानं केली आहेत.

सोशल मीडियावर मराठमोळ्या शिवचा फॅन क्लब जास्त आहे. एका चाळीत जन्म झालेल्या शिवनं आता हिंदी बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरावं अशी त्याच्या लाखो चाहत्यांची इच्छा आहे. आता मराठी मनोरंजन विश्वातील मोठं नावं म्हणून शिवची लोकप्रियता सगळीकडे झाली आहे. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वामध्ये नशीब त्याच्या बाजुनं झुकणार की त्याला नाराज करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT