Bigg Boss Troll esakal
मनोरंजन

Bigg Boss Troll : 'पक्षपातीपणा झाला, एमसी स्टॅन कसा जिंकला? विजेता शिवच!' नेटकऱ्यांचा संताप

सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत त्यामध्ये बिग बॉसमध्ये पक्षपातीपणा झाला आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss 16 mc stan winner shiv thakare runner up : टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय अशा बिग बॉस १६ चा अंतिम सोहळा काल पार पडला. त्यामध्ये ज्याच्याकडून विजयाच्या अपेक्षा होत्या तो उपविजयी ठरला आणि चाहत्यांमध्ये नाराजी पसरली.

मराठमोळ्या शिव ठाकरेच्या विजयाकडे सगळेजण डोळे लावून बसले होते. मात्र अनपेक्षित निकालानं लाखो चाहत्यांची, नेटकऱ्यांची नाराजी लपून राहिली नाही.

बिग बॉसच्या अंतिम पर्वाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर हा शो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत त्यामध्ये बिग बॉसमध्ये पक्षपातीपणा झाला आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

अनेकांना या स्पर्धेच्या शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये प्रियंका चौधरी आणि शिव ठाकरे यांना पाहायचे होते. मात्र तसे काही झाले नाही. शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये शिव आणि एमसी स्टॅन हे दोघे होते. त्यांच्यात चुरस होती. अनेकांना शिव ठाकरेच विजयी होणार याची पूर्ण खात्री होती.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

मराठी बिग बॉसचे विजेतेपद पटकावलेल्या शिव ठाकरेकडे अनुभवाची काही कमी नव्हते. बिग बॉसमधील प्रत्येक टास्कमध्ये त्यानं भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरातील त्याचे वागणेही सगळ्यांशी सहकार्यपूर्ण होते.

त्यामुळे अनेकांना तो विजयी होईल असे वाटत होते. मात्र बिग बॉसचा होस्ट सलमान खाननं ट्रॉफी एमसी स्टॅनच्या हातात दिल्यावर कित्येकांना मोठा धक्काच बसला. आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बिग बॉसलाच धारेवर धरले.

बिग बॉसच्या मेकर्सनं पक्षपातीपणा केला आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या निकषावर एमसी स्टॅनला विजेता म्हणून घोषित केले हे सांगावे. बिग बॉसचा हा निकाल आम्हा सर्वांसाठी धक्कादायक आहे. कित्येकांनी तर यापुढे आम्ही हा शो पाहणं कटाक्षानं टाळणार आहोत.

असेही म्हटले आहे. प्रियंकाला बाहेरचा रस्ता दाखवत एमसी स्टॅन हा अंतिम दोन स्पर्धकांच्या यादीत असेल असे तर कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळेच की काय जो निकाल जाहीर झाला त्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.

निकालानंतर नेटकऱ्यांनी बिग बॉसचे मेकर्स आणि एमसी स्टॅनवर आगपाखड केली आहे. केवळ तो रॅपर आहे, त्याच्या नावाभोवती मोठे ग्लॅमर आहे या कारणास्तव त्याला विजेता म्हणून जाहीर करण्यात आले की काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. कित्येकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर शेलक्या शब्दांत टिप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election Akhilesh Yadav: उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; भाजपला टक्कर देण्यासाठी 'हे' मुद्दे घेऊन मैदानात

Onion Rate: कांद्याचे भाव घसरले! 9 दिवसांत 1,800 रुपयांची घसरण; लासलगावमध्ये आजचा दर किती?

आनंद... ज्याचा त्याचा! ; जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि दिग्गज खेळाडूंच्या आठवणी जतन करण्याचा अनोखा आनंद

INDIA PAVILION AWARD: व्हेनिस आर्ट बिएनालेमध्ये भारताचा डंका! 'बेस्ट नॅशनल पॅव्हेलियन' पुरस्कार; काय आहे खास? जाणून घ्या

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

SCROLL FOR NEXT