Bigg Boss 16 Esakal
मनोरंजन

Bigg Boss 16: टिना जाताच शालीनचं डिप्रेशन पळालं! नाचत,गात घालतोय धिंगाणा

Vaishali Patil

टिव्ही वरिल वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस 16 आता त्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. नुकतच कमी मतं पडल्यामुळे टिना दत्ताला घराबाहेर काढण्यात आलं. फराह खानने शनिवार का वारमध्ये चांगलाच हल्ला केला. तिनं प्रियंका आणि टिनाचा चांगलाच क्लास लावला.

त्यानंतर टिनाला घराबाहेर काढण्यात आल.आता शिव ठाकरे, एमसी स्टॅन, शालीन भानोत आणि प्रियंका चहर चौधरी सुरक्षित आहेत.आता टिना बाहेर येताच घरातील वातावरणही पूर्णपणे बदलून गेले

बिग बॉसने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये शालिन भानोटचा आनंद थेट दिसत आहे. तो निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्यासोबत बागेत बसला आहे. तो त्यांना ड्रामा करुन सांगतो की, 'मी पूर्वी खूप दुःखी होतो आणि आता मला खूप छान वाटतं आहे.'

त्याची अ‍ॅक्टिंग पाहून सगळेच हसायला लागतात. इतकच नाही तर तो कॅप्टनच्या खोलीत ठेवलेल्या सोफ्यावरही नाचतो त्याच्यासोबत एमसी स्टॅनही नाचतो. त्याच वेळी, तो वॉशरूम परिसर साफ करताना गाणं गातो आणि नाचताना देखील दिसत आहे.

टिना दत्ता गेल्यानंतर शालीनच्या आनंदाला पारावार उरलेला दिसत नाही तर दुसरीकडे, हे सर्व पाहून अर्चना गौतम आणि प्रियांका चाहर चौधरी यांना राग येतो. किचन परिसरात अर्चना गौतम सांगते की, 'एकाने दोन लोकांची इमेज खराब करून त्यांना बाहेर काढलं. त्याने जे काही कृत्य केलं आहे त्याचं एक दिवस त्याला याचा पश्चाताप होईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT