Bigg Boss 16 promo: Tina Datta, Manya Singh, Soundarya Sharma get punished for apologising Instagram
मनोरंजन

Big Boss 16: स्पर्धकांचे धाबे दणाणले; आता 'सॉरी' बोलल्यावरही मिळतेय कठोर शिक्षा

सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १६ मध्ये असं काही घडलंय,जे ऐकल्यानंतर स्पर्धकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

प्रणाली मोरे

Big Boss 16: बिग बॉस १६ नं यंदाचा सिझन गाजवायला सुरुवातही केलीय. सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या या शो मध्ये असं काही घडलंय,जे ऐकल्यानंतर स्पर्धकांच्या पायाखालची जमिनच सरकली. बिग बॉसच्या पुढच्या भागात खूपच ट्विस्ट अॅन्ड टर्न्स पहायला मिळणार आहेत. बिग बॉसच्या पुढील भागात स्पर्धकांना त्यांच्या नॉमिनेशन प्रक्रियेविषयी सांगितलं जाईल. नॉमिनेशनच्या बाबतीत यावेळी बिग बॉसनी खूपच कडक भूमिका घेतलेली आहे. आणि बिग बॉसची ही कडक भूमिका पुढील भागात स्पर्धकांना मात्र भारी पडणार असं दिसत आहे. सध्या याचा प्रोमो भलताच व्हायरल झाला आहे. (Big Boss 16 promo: Tina Datta, Manya Singh, Soundarya Sharma get punished for apologising)

आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू शकाल की बिग बॉस नॉमिनेशन प्रक्रियेबद्दल सांगतात. आणि ते स्पर्धकांना सांगतात की कोणीही नॉमिनेशन दरम्यान कोणालाही नॉमिनेट करताना असं नाही बोलणार की त्याच्याजवळ आणखी कुठलं ऑप्शन नाही आहे. पण बिग बॉसने इतकं समजावल्यावर देखील काही सदस्यांनी तेच केलं ज्याच्यासाठी मनाई करण्यात आली होती.

टीना दत्ता, सौंदर्या आणि मान्या सिंग हे घरातील तीन सदस्य आहेत ज्यांनी दुसऱ्या स्पर्धकांना नॉमिनेट करताना कोणतंही ठोस कारण सांगितलं नाही आणि त्यांना नॉमिनेट करत 'सॉरी' म्हटलं. बिग बॉसनं सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तिघींवर बिग बॉस फारच रागावला. बिग बॉसने सर्वांना नॉमिनेशनचा स्वतंत्र अधिकार दिला होता. पण या तिन्ही सदस्यांनी कोणतंही कारण न देता स्पर्धकांना उगाचच नॉमिनेट केलं.

या तिघींच्या अशा वागण्यानं बिग बॉसनं तिघींना शिक्षा सुनावली,ज्यानंतर घरातल्या इतर सदस्यांची बोलतीच बंद झाली. बिग बॉसने टीना,मान्या आणि सौंदर्यां यांना शिक्षा ठोठावत पुढची सूचना मिळेपर्यंत तिघींनीच घरातील सर्व कामे करायचा आदेश दिला. बिग बॉसने म्हटलं की,या तिघी घरातील सर्व कामं करतील,हीच तिघींची सजा. कारण यांनी बिग बॉसनं इतकं समजावल्यानंतरही नॉमिनेशन दरम्यान सांगितलेले नियम पाळले नाहीत.

एवढंच नाही तर आजच्या बिग बॉस १६ च्या एपिसोडमध्ये उडारियां कलाकार प्रियंका आणि अंकित यांच्यातील नात्यावर देखील प्रश्नोत्तरांचा खेळ रंगेल. निम्रत कौर आणि गौतम..अंकितला त्याच्या आणि प्रियंकाच्या नात्याविषयी बोलतं करतील. यावर अंकित त्याला म्हणेल की ,'आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. पण त्यापुढच्या नात्याविषयी अद्याप काही विचार केलेला नाही', असं देखील अंकित म्हणेल.

अंकितनं आपल्या आणि प्रियंकाच्या नात्याविषयी स्पष्टिकरण देताना म्हटलं की,''आम्ही एकमेकांना खूप पसंत करतो ,पण भविष्यात प्रियंकासोबत पुढे जायचा तो विचार करत नाही''. आता पहायचं की बिग बॉसच्या घरात दोघांचं नातं पुढे जातं की आहे त्या नात्यातही दुरावा येतो. पुढील भागात हे पाहणं खूप इंट्रेस्टिंग असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT