Shiv Thakare Romantic Photo with girlfriend veena jagtap Google
मनोरंजन

Shiv Thakare Romantic Photo:काळोखात गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना दिसला शिव,'ते' फोटो पाहून चाहते हैराण

बिग बॉसच्या घरात स्त्री सदस्याशी कोणतेही प्रेमाचे संबंध जुळवण्यात रस नसलेल्या शिवचे गर्लफ्रेंड वीणा जगतापसोबतचे जुने इंटिमेट फोटो व्हायरल होताना दिसतायत.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16:बिग बॉस सिझन १६ मध्ये सध्या प्रेमाला बहर आलेला दिसतोय. जेव्हापासनं शो सुरु झालाय तेव्हापासून प्रत्येकजण घरात प्रेमाचा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्याला अजून त्यात यश मिळालं नाही तो दुसऱ्याच्या लव अॅंगलवर कमेंट करताना दिसत आहे. मराठी बिग बॉस विनर शिव ठाकरे हा त्यापैकी एक आहे.

बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांत शिव ठाकरेला शालीन भनोट-टीना दत्ता आणि गौतम विज-सौंदर्या शर्मा यांच्या नात्यावरनं अनेकदा कमेंट करताना पाहिलं गेलंय. तो त्यांच्यातील प्रेमाला सरळ सरळ 'फेक' संबोधत आहे. (Shiv Thakare Romantic Photo with girlfriend veena jagtap)

खासकरुन गौतम आणि सौंदर्या फक्त कॅमेऱ्यासाठी सगळं करतायत असं म्हणत त्यानं त्यांच्या नात्याला 'फेक' म्हटलं आहे. एका एपिसोडमध्ये गौतम आणि सौंदर्या रोमॅंटिक मूडमध्ये दिसले. त्या दोघांना प्रेमात आकंठ बुडालेलं पाहत शिव ठाकरे त्यांची फिरकी घेऊ लागला. पण तुम्हाला माहित आहे का दुसऱ्यांना नात्यावरनं कमेंट करताना दिसणारा शिव बिग बॉस मराठीच्या घरात वीणा जगतापच्या प्रेमात पडल्यानंतर आपल्या भावनांना आवरु शकला नव्हता.

सोशल मीडियावर शिव ठाकरे चे बिग बॉस मराठीच्या घरातील काही फोटो व्हायरल होत आहेत. बिग बॉस मराठीमध्ये शिव हा मराठी अभिनेत्री वीणा जगतापच्या प्रेमात पडला होता. दोघांना एक-दोनदा नाही तर अनेकदा एकमेकांशी जवळीक साधताना पाहिलं गेलं आहे. कॅमेऱ्यासमोर बिनधास्त रोमान्स करणाऱ्या त्या दोघांना पाहून जोरदार चर्चा तेव्हा रंगली होती.

शिव कधी वीणाला मिठीत घ्यायचा तर कधी तिला किस करायचा. पण बिग बॉस १६ च्या घरात मात्र शिव ठाकरेचा हा रोमॅंटिक अंदाज कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याचे चाहते त्याचे व्हायरल झालेले जुने रोमॅंटिक फोटो पाहून शॉक झालेयत. तर काही लोक यावरनं शीवची मस्करी करताना दिसत आहेत. कोणी त्यावरनं शिवला नावं ठेवताना दिसत आहेत तर प्रेमात पडलेल्या गौतमची खिल्ली उडवल्यामुळे शिवला ऐकवत आहेत.

माहितीनुसार,वीणा आणि शिव ठाकरे यांची भेट ही बिग बॉसच्या घरात झाली होती. शो मधनं बाहेर आल्यावर ते काही काळ एकत्र होते. पण त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. बिग बॉस १६ मध्ये शिवचे कोणत्याही स्त्री सदस्यासोबत अद्याप नाव जोडले गेलेले नाही. ना त्याचा इंट्रेस्ट त्यात आहे अंस दिसतंय. पण तरी देखील लोकांना मात्र त्याचा लव्ह इंट्रेस्ट पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटची आठवण

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Rain-Maharashtra Latest Live News Update: मराठवाड्यात मोठी धरणे आणि प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या दिशेने

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

होम्बळे फिल्म्सने 'कांतारा: अध्याय 1' मध्ये गुलशन देवय्या यांची 'कुलशेखर' या भूमिकेत केली घोषणा

SCROLL FOR NEXT