MC Stan Debut: Esakal
मनोरंजन

MC Stan Debut: एमसी स्टॅनवर सलमान 'मेहरबान'! 'फर्रे'तून बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज

Vaishali Patil

MC Stan Debut: गेल्या काही दिवसांपासून सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री तिच्या डेब्यू चित्रपटासाठी चर्चेत होती. अलिजेह अग्निहोत्रीच्या 'फर्रे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमधील अलिझेहचा अभिनय पाहिल्यानंतर सर्वांनी तिचे कौतुक केले आहे.

मात्र या ट्रेलरमध्ये अलिझेहपेक्षा चित्रपटातील शेवटच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतेल आहे. तर हा आवाज आहे 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनचा.

होय, तर विजेता एमसी स्टॅनच्या चाहत्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे. सलमान खानच्या फर्रे या चित्रपटातून एमसी स्टॅन हा बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण करत आहे. आता स्वत: स्टॅनने ही बातमी चाहत्यांना सांगितली आहे.

एम स्टॅनने अलिजेह अग्निहोत्रीच्या फर्रेचा ट्रेलर शेअर करताना लिहिले की, बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाण्यासाठी तयार आहे. पुढे एमसी स्टॅनने लिहिले, 'टायटल ट्रॅक, सलमान खानच्या चित्रपटातून माझे पार्श्व पदार्पण, बॉलिवूडमध्ये प्रवेश.' फर्रेचे टायटल ट्रँक स्टॅनने गायिले आहे.

स्टॅनच्या या घोषणेनंतर चाहते खुप खुश आहेत त्यांनी सोशल मिडियावर त्याचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

फर्रे हा चित्रपट 24 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातूनच अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात अलिझेह व्यतिरिक्त सौमेंद्र पाधी, साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिश्त आणि रोनित बोस रॉय यांच्या महत्वाच्या भुमिका आहेत. ट्रेलर नुसार 'फर्रे' हा एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये अलिझेह एका विद्यार्थिनीची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT