Bigg Boss 17: Orry to enter the Bigg Boss house - Esakal
मनोरंजन

ORRY In Bigg Boss 17: बॉलिवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी करणार 'बिग बॉस 17' मध्ये एंट्री! 'वीकेंड का वार' मध्ये होणार धमाका!

'बिग बॉस 17' च्या घरात लवकरच ओरीची ग्रँड एन्ट्री होणार आहे.

Vaishali Patil

Orry to enter the Bigg Boss 17 house:

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान होस्ट करत असलेला टिव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉसचा 17 वा सिझन खुप चर्चेत आहे. या शोमध्ये आत्तापर्यंत तीन स्पर्धक घरातून बाहेर गेले असून आता घरात काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

मात्र यात कोणते स्पर्धक घरात बंद होणार याबाबत सोशल मिडियावर खुप चर्चा सुरु आहेत. त्यातच आता बिग बॉसच्या घरात असा एक स्पर्धक जाणार आहे जो काही न करता फक्त त्याच्या फोटोमुळे लाईमलाईटमध्ये राहतो. बॉलिवूडचा भाग नसतानाही इंडस्ट्रीतील जवळपास सर्व सुपरस्टार्सचा तो बेस्ट फ्रेंड आहे. तो व्यक्ती म्हणजे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेला ओरी.

ओरी म्हणजेच ओरहान अवतारमणी. आता ओरी लवकरच रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' च्या विकेंड का वार या भागात दिसणार आहे. तो केवळ घरात विकेंड का वार मध्ये येणार नसून त्याची घरात वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा आहेत.

मात्र ओरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करेल की नाही याबाबत अद्याप निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. आगामी विकेंड वॉरमध्ये ओरी बिग बॉसच्या घरातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवताना दिसणार आहे.

ओरीचे सोशल मीडियावर अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. बी-टाऊनमधील प्रत्येक सेलिब्रिटीसोबतचे जसे न्यासा देवगण, सारा अली खान, अनन्या पांडे, आलिया भट्ट इतकच नाही तर निता अंबानी किंवा अनेक इतर क्षेत्रातील व्यक्तीसोबत त्याचे फोटो व्हायरल होत असतात. आता तो सलमान खानसोबत बिग बॉसचा स्टेज शेअर करताना दिसणार आहे

तर बिग बॉसच्या या आठवड्याच्या नॉमिनेशवर नजर टाकली तर यावेळी घरातून अंकिता लोखंडे, अनुराग डोवाल, सनी आर्या, सना रईस खान आणि जिग्ना व्होरा यांना बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Municipal Election 2026 : चंद्रपुरात भाजपा सत्ता राखणार? 'या' प्रभागातील लढतीकडे सर्वाचं लक्ष, प्रतिष्ठा पणाला

Pune Voter Awareness : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये; हडपसर परिसरात 'स्विप'चा जागर!

Nagpur Municipal Election 2026 : नागपूरमध्ये 'या' प्रभागात चुरशीची लढत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

ZP Election Date 2026 : जिल्हा परिषद निवडणुका मार्च-एप्रिलपर्यंत लांबणार नाही; 'थेट तारीख' निश्चित झाल्याने राजकीय रणधुमाळीला वेग!

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाच्या संजनाताई पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT