Bigg Boss 17 Weekend Ka Vaar:  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: "अगं अंकिता तुझा नवरा...", सलमाननं उघड केलं विकीचं पितळ! व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 17 Weekend Ka Vaar: बिग बॉस 17 मधील वीकेंड का वारची पहिली झलक समोर आली आहे, ज्यामध्ये सलमान खान अंकिता लोखंडेचा पती विकी जैनला एक्सपोज करताना दिसत आहे.

Vaishali Patil

Bigg Boss 17: बिग बॉस 17 या रिअॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोमधील स्पर्धक आता घरात रमले आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्यातच सर्वात जास्त फॅन फॉलोविंग असलेली स्पर्धक म्हणेज अंकिता लोखंडे हिची जास्तच चर्चा आहे.

अंकिताने या घरात तिचा पती विकी जैनसोबत एंट्री केली. या दोघांच्या चाहत्यांना वाटलं होत की हे घरात पावर कपल म्हणुन राहतील मात्र तसं काहीही झालेलं नाही. पहिल्या दिवसापासून अंकिता आणि विकी घरात एकमेकांसोबत भांडत आहे.

अंकिताने तिला घरात एकटं सोडल्याचा आरोप विकीवर केला तर विकीनंही अंकितावर अनेक आरोप केले. आता पुन्हा अंकिता आणि विकीमध्ये खटके उडाले आहेत.

त्यातच आता 'विकेंड का वार' मध्ये सलमान खान देखील विकीचा क्लास घेताना दिसणार आहे. निर्मात्यांनी या विकेंड का वार ची एक झलक सोशल मिडियावर शेयर केली आहे ज्यात सलमान विकीचं पितळ उघड करतो तर हे ऐकल्यानंतर अंकिता रडायला लागते.

बिग बॉस 17 च्या आगामी 'वीकेंड का वार'चा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान घरातील सदस्यांसोबत बोलताना दिसत आहे. यात सलमान विकीचा पर्दाफाश करतो.

सलमान खान अंकिताला म्हणतो की, 'तू नेहमीच टेलिव्हिजनवर लीड आहेस, मग आता अचानक तू इशा आणि विकीच्या भाऊ-बहिणीच्या नाटकात मित्राची भूमिका कशी काय करतेस? तुझ व्यक्तिमत्व हरवायला तू इथे आली आहेस का? तू तुझ्या पती विकीसोबत यायचं ठरवलं आणि तुझा नवरा खानजादीला तुझ्याशी भांडायला सांगतो.'

यानंतर सलमान विकीला म्हणतो, 'प्रेम दिलं, पैसा दिला... हे सगळे म्हणत आहेत, प्रेम तूच दिले आहेस का विकी?'. हे ऐकून विकी घाबरतो आणि म्हणतो 'मी मस्करी करत होतो'. यावर सलमान म्हणतो, 'तो विनोद नव्हता.

जेव्हा अंकिताचा नवरा विकीचे गुपित उघड होत तेव्हा ती भावूक होते आणि तिच्या डोळ्यात येतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी दोघांना ट्रोल करत आहे तर अनेकांनी विकीला पाठिंबा दिला आहे. मागच्या आठवड्यातील 'विकेंड का वार'मध्ये सलमानने इशाला खुप झापलं होतं. आता त्याने विकीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

SCROLL FOR NEXT