Bigg Boss 17 Sana raees Khan's evicted from Bigg Boss house salman khan SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 17: लोकांनी दाखवला बाहेरचा रस्ता! सना खानचा बिग बॉसमधला प्रवास संपला

बिग बॉसमधून सना खान बाहेर गेलीय

Devendra Jadhav

Bigg Boss 17 Sana Khan Evicted: बिग बॉस 17 च्या घरातून सना रईस खानला एलिमिनेट व्हावं लागलंय. सना ही पेशाने वकील आहे आणि तिचे नाव आर्यन खान-शीना बोरा सारख्या हायप्रोफाईल केसेसशी जोडले गेले होते.

सना बिग बॉस 17 मधील सर्वात कमकुवत खेळाडू मानली जात होती. त्यामुळे जनतेने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

(Bigg Boss 17 Sana raees Khan's journey in Bigg Boss is over)

या आठवड्यात सना खानसह घरातील सदस्यांनी अनुराग डोवाल, अरुण श्रीकांत महाशेट्टी, विकी जैन, नील भट्ट, फिरोजा खान म्हणजेच खानझादी, मुनव्वर फारुकी आणि अभिषेक कुमार यांना घरातून बाहेर काढण्यासाठी नामांकित केले.

या सर्व स्पर्धकांमध्ये अरुण महाशेट्टी आणि सना खान यांना सर्वात कमी मतं मिळाल्याने ते दोघे डेंजर झोनमध्ये होते. अखेरीस सलमान खानने जाहीर केले की, लोकांच्या कमी मतांमुळे सनाला बिग बॉसच्या घरातून जावं लागतंय.

वकील असलेल्या सनाने बिग बॉसच्या घरात तिच्या डोक्याचा वापर केला आणि विवाहित असलेल्या विकी जैनशी मैत्री केली. या दोघांच्या मैत्रीची खुप चर्चा झाली.

मात्र, गेल्या आठवड्यात विकी आणि सना यांच्यातील भांडणामुळे लोकांचा सनावरील विश्वास उडाला. आणि सनाला बिग बॉसमधून बाहेर जावं लागलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT