Bigg Boss 17 Wildcard Contestant Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: नवीन वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे घरात राडा! इशा शॉक तर अभिषेक ढसाढसा रडला; व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Bigg Boss 17 Wildcard Contestant: बिग बॉसचा यंदाचा सिझन पहिल्या दिवसांपासूनच चर्चेत आहे. या सिझनचा दुसरा आठवडा खुपच रंगतदार ठरला. या आठवड्यात घरात ड्रामा, ताण तणाव, हाणामारी, गटबाजी, आरोप-प्रत्यारोप सगळंच पाहायला मिळालं आहे.

त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे तर घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल रोष वाढत आहे. त्यातच आता निर्मात्यांनी देखील घरातील स्पर्धकांना झटका दिला आहे. बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच दुसऱ्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे.

शुक्रवारच्या शो दरम्यान दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये एक घरात नवीन एंट्री पाहायला मिळते. जो ईशा मालवीयाचा बॉयफ्रेंडची आहे. आता बिग बॉसच्या घरात 'उदारियां' फेम समर्थ जुरेल शोमध्ये प्रवेश करणार आहे. आता समर्थने एंट्री केल्यानंतर एक वेगळ्याच लेव्हलचा ड्रामा घरात सुरु होणार आहे.

बिग बॉसने रिलीज केलेल्या प्रोमो नुसार, सुरवातीला ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांना वेगळ्या खोलीत बोलावण्यात येते आणि दोघांचा फोटो दाखवण्यात येतो जो नंतर ईशा आणि समर्थच्या रोमँटिक फोटोने बदलतो. यानंतर बिग बॉस घरात समर्थच्या एंट्रीबाबत सांगतो.

समर्थला समोर पाहून ईशा थक्क होते. इतकच नाही तर आपण समर्थची गर्लफ्रेंड नसल्याचं ती सांगते. इशाचे बोलणे एकून समर्थला धक्का बसतो तर दुसरीकडे अभिषेक तर शॉकमध्ये दिसतो.

आत्तापर्यंत ईशाला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेला अभिषेक समर्थच्या एंट्रीने भावुक होतो आणि लॉन परिसरात ढसाढसा रडतो तर घरातील बाकीचे सदस्य अभिषेकची समजावताना दिसत आहे.

आता विकेंड का वार मध्ये आज सलमान काय नवीन गेम खेळतो आणि कुणाला रागवतो हे कळेलच. त्याच बरोबर घरातून कोणाचा पत्ता कट होणार याकडेही सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT