Bigg Boss 17 Weekend Ka Vaar With Salman Khan Written Update Highlights no nomination this week  Esakal
मनोरंजन

Bigg Boss 17: 'विकेंड का वार' ठरला जोरदार! पहिल्याच आठवड्यात बिग बॉसने कुणाला दाखवला बाहेरचा रस्ता?

Vaishali Patil

Bigg Boss 17 weekend ka vaar: सलमान खानचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 17' सध्या खुपच चर्चेत आहे. सध्या घरात अनेक राडे होताना दिसत आहे. घरातील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडत आहेत.

आता घरात आठवड्यातील पहिला विकेंड का वार पार पडला. यावेळी सलमान पुन्हा त्याच्या जून्या अवतारात दिसला. त्याने घरातील स्पर्धकांसोबत गेमही खेळला आणि त्यांचा क्लासही घेतला.

यावेळी कंगना रणौत यावेळी शोमध्ये दिसली. कंगना तिच्या तेजस चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचली होती. सलमान खानने कंगनासोबत डान्सही केला.

तर वीकेंड का वारमध्ये सलमान खान खानजादीवर चांगलाच भडकला. मुनव्वर खानजादीमध्ये चांगलाच वाद झाला होता त्यावर सलमानने तिचा क्लास घेतला आणि तिला तंबी दिली. त्यातच अंकिता आणि मन्नारा यांच्यातही वाद झाला.

यासगळ्या गेम नंतर वेळ आली ती बिग बॉस 17 च्या पहिल्या नॉमिनेशनची. मन्नारा चोप्रा, नावेद सोले आणि अभिषेक कुमार हे तीन स्पर्धकांचे नॉमिनेशन झाले होते. त्यात सलमानने घरातून बाहेर जाण्याऱ्या स्पर्धकांमध्ये मन्नाराचे नाव घेतले.

यावेळी सलमान म्हणाला की, मन्नाराला कमी मत मिळाल्यामुळे तिला घरातून बाहेर जावे लागणार आहे. मन्नाराला चांगलाच धक्का बसला. मात्र नंतर सलमानने सांगितले की, तो विनोद करत होता. तिला घर सोडून जावं लागणार नाही.

त्यानंतर सलमानने घोषणा केली की, पहिला आठवड्यात सर्व स्पर्धक सुरक्षित आहे. नवरात्रीच्या निमित्ताने सर्व स्पर्धकांसाठी आनंदाची बातमी आहे. घरातून कोणीही बाहेर जाणार नाही. त्यामुळे आता या आठवड्यात सगळेच सुरक्षित आहेत.

सध्या घरातील सर्वच स्पर्धक उत्तम गेम खेळत आहे. तर मुन्नवर आणि अंकिता लोखंडे या दोघांना चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. ते दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर आहेत. मुन्नवर फारुकी हा लॉकअपचा विजेता ठरला आहे.

तर अंकिता टिव्हि क्विन आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. आता घरात अजून कोणाता राडा होतो आणि या आठवड्यात कुणाचे नॉमिनेशन होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political Controversy News : पुण्यात महापौरांचा हेडगेवारांना हार, शाहू महाराजांना केवळ नमस्कार? कोल्हापुरातून निषेधाची मागणी

Urfi Javed Viral Video: फॅशनच्या नावाखाली उर्फीने चक्क केकचा बनवला ड्रेस, पाहा व्हायरल व्हिडिओ

Thomas Candy : इंग्लंडमध्ये जन्म, पण मराठी भाषेसाठी ५० वर्षे काम; विरामचिन्हांच्या जनकाचं स्मारक दुर्लक्षित

Success Story: AIIMS च्या डॉक्टरांचा चमत्कार! २ वर्षांनंतर युवतीच्या घशाखाली उतरला सुखाचा घास; १० तासांची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

SCROLL FOR NEXT