Abhijeet Bichukale esakal
मनोरंजन

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अभिजीत बिचुकले सध्या काय करतोय?

सकाळ डिजिटल टीम

बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश मिळालेलं नाही.

सातारा : स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या. नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केलेत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनाही त्यानं कित्येकदा खुलेआम आव्हान दिलंय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानं मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवलीय. या निवडणुकीत त्याला अवघी 150 मतं मिळाली होती.

बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या असल्या तरी त्याला एकदाही यश मिळालेलं नाही. मात्र, तरीही हार न मानता त्याचे प्रयत्न सुरूच आहेत. 2019 चा मुख्यमंत्री मीच ठरवणार', असं बेधडक वक्तव्यही त्यानं केलं होतं. त्यानंतर त्यानं पंढरपूरमधूनही नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथंही त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अवघी 137 मतं त्याला मिळाली होती. परंतु, अभिजीत बिचुकले हा आता वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय. अनेकांना प्रश्न पडला असेल की, बिचुकले सध्या काय करतोय?

Big Boss च्या सिजन 2 च्या पर्वातही अभिजित बिचुकलेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं होतं. आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्ष्यही वेधून घेतलंय. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. ‘2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार’, ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’, ‘कवी मनाचा नेता’ अशी अनेक वक्त्यव्य त्यानं केलेली पाहायला मिळतात. याच कारणामुळं त्याला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणूनही प्रवेश मिळाला होता. त्यातही त्यानं चांगलीच वाहवा मिळवली होती. बिग बॉसच्या घरात असताना त्यांना चेक बाऊन्सप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती, त्यावेळी बिचुकले प्रकरण खूप गाजलं होतं. त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली होती.

बिग बॉसच्या घरात त्याची अभिनेत्री शिवानी सुर्वे सोबत चांगली मैत्री जुळली होती. बिचुकले आता आणखी एका कारणामुळं प्रसिद्धी मिळवताना दिसतोय. नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा 'सातारा कंदी पेढे' (Satara Kandi Pedha) विक्री व्यवसाय सुरू केलाय. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा कंटेस्टंट पराग कान्हेरे याने नुकतीच ही बातमी कळवलीय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार आहे. पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ त्याने हे कंदी पेढ्यांचं दुकान थाटलंय. कान्हेरेनं बिचुकलेला त्यांच्या या नव्या व्यवसायासाठी हटक्या अंदाजात शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘बिचुकले’ यावेळी नाही चुकले… असं म्हणून बिचुकलेचं पुण्यात स्वागत केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT