kiran mane, kiran mane news, raavrambha, raavrambha teaser, raavrambha starcast SAKAL
मनोरंजन

Buddha Pournima 2023: अंगावर येणार्‍या 'निर्बुद्ध' सांडांबरोबर... किरण मानेंचा बुद्ध पौर्णिमेबद्दल खास संदेश

किरण माने यांनी सोशल मीडियावर बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास फोटो शेयर करत एक छान पोस्ट लिहिली आहे.

Devendra Jadhav

Kiran Mane on Buddha Pournima 2023 News: आज बुद्ध पौर्णिमा. जगाला शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा जगात आज जगभरात आहे. गौतम बुद्धांचे अनेक अनुयायी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करत आहेत.

अशातच मराठी अभिनेते किरण माने यांनी बुद्ध पौर्णिमेबद्दल खास संदेश दिलाय. किरण माने यांनी सोशल मीडियावर बुद्ध पौर्णिमेनिमित्त खास फोटो शेयर करत एक छान पोस्ट लिहिली आहे.

किरण माने लिहितात.. द्वेषाविरोधातला विद्रोह - प्रेम करणं.. असत्याविरोधातला विद्रोह - सत्य शोधणं.. गुलामगिरीविरोधातला विद्रोह - स्वातंत्र्य मिळवणं.. विषमतेविरोधातला विद्रोह - समता मानणं.. अन्यायाविरोधातला विद्रोह - न्याय देणं.. पाठीमागून अंगावर चाल करून येणार्‍या

'निर्बुद्ध' सांडांबरोबर,विवेकी विचारांनी 'युद्ध' खेळणं : 'बुद्ध' अंगीकारणं ! अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे

किरण माने हे आगामी 'रावरंभा' चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात माने यांनी महत्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रेलर लॉंच सोहळ्यात त्यांचा पहिला लुक समोर आला होता. माने यांच्या लुक सह एक पोस्टर आउट झालं आहे.

''मालिका, चित्रपट, नाटकांमधून चाहत्यांची मनं जिंकणारे बिग बॉस फेम मराठीतील प्रतिभावंत आणि हरहुन्नरी अभिनेते किरण माने 'हकीमचाचा' च्या अनोख्या भूमिकेत.. ''असे कॅप्शन या पोस्टरला देण्यात आले आहे.

यामध्ये माने काळा पागोटा, अंगावर शेला आणि लांब पांढरी दाढी अशा लुक मध्ये दिसत आहेत. त्यांच्या लुकवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून त्यांचे कौतुक केले आहे.

किरण माने रावरंभा सिनेमाच्या निमित्ताने सिनेमातील प्रमुख कलाकार ओम भुतकर आणि मोनालिसा बागल यांच्यासोबत झळकणार आहेत.

येत्या १२ मे ला ‘रावरंभा’ इतिहासातील हे ‘मोरपंखी पान’ पडद्यावर रसिकांसमोर उलगडणार आहे.

निर्माते निर्माते-शशिकांत शीला भाऊसाहेब पवार आणि दिग्दर्शक अनुप जगदाळे ही प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT