Bigg Boss Marathi 3
Bigg Boss Marathi 3 
मनोरंजन

Bigg Boss Marathi 3: कोण ठरणार या पर्वाचा महाविजेता?

स्वाती वेमूल

अखेर तो क्षण आला! १०० दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीचं नवं घर नवीन सदस्यांनी भरलं आणि महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाला. १५ सदस्यांसोबत या प्रवासाची सुरूवात झाली. त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त पाच सदस्य उरले आहेत. विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा हे पाच स्पर्धक ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांनी कार्यक्रम सुरु होताच प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळवण्यास सुरुवात केली. या १०० दिवसात हे सदस्य अनेक भावभावनांना, अनेक चढउतारांना सामोरे गेले. कधी त्यांच्या हसण्याने तर कधी त्यांच्या भांडणाने तर कधी त्यांच्या रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने या चार भिंतींना, बिग बॉसच्या घराला घरपण आलं. पण, आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार आहे. टॉप ५ मधून कोणता सदस्य बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता ठरणार हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. (Bigg Boss Marathi 3 Grand Finale)

पहिल्या आठवड्यापासून घरामध्ये ग्रुप पडले. बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून सदस्यांची भांडणं बघितली. प्रत्येक सदस्यामध्ये खेळाडूवृत्ती ही होतीच. पण या घराने उत्कर्षचं बुध्दीचातुर्य पाहिलं, मीनल - जय – विशालची टास्क जिंकण्याची जिद्द बघितली, मीराची चीडचीड आणि किचनवरच प्रेम पाहिलं, तृप्ती ताईंचा बेधडक अंदाज पाहिला, सोनालीची अखंड बडबड ऐकली.

घराचा दरवाजा आता शेवटचा उघडणार आहे. फरक इतकाच असणार की, यावेळेस दरवाजा पलीकडे उभे असणार आहेत बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप २ सदस्य आणि त्यातून एक पर्वाचा महाविजेता ठरणार आहे. बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी सिझन ३ चा ग्रँड फिनाले येत्या २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT