Bigg Boss Marathi 4 amruta dhongade punished and debar form captaincy task for two week  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: शहाणपणा नडला! बिग बॉस कडून अमृता धोंगडेला जबर शिक्षा..

काल झालेल्या कॅप्टनसी कार्यात अमृता धोंगडेने अती हुशारी करत बिग बॉसच्या घरात तोडफोड केली.

नीलेश अडसूळ

Bigg Boss Marathi 4:  बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता पन्नास दिवसांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजवर बिग बॉसच्या घराने आपले खूप मनोरंजन केले. या पन्नास दिवसात आपण राडा, प्रेम, दंगा, तोडफोड सगळंच पाहिलं. आता स्पर्धकांचा शहाणपणाच त्यांना नाडताना दिसत आहे. टास्कच्या नावाखाली बिग बॉसच्या घराची तोडफोड करणाऱ्या अमृता धोंगडेला बिग बॉसने चांगलीच कडक शिक्षा सुनावली आहे.

(Bigg Boss Marathi 4 amruta dhongade punished and debar form captaincy task for two week )

सध्या बिग बॉसच्या घरात टिकण्यासाठी स्पर्धक वाटेल त्या थराला जात आहे. तसेच बिग बॉस कडून दिले जाणारे टास्क तर दिवसागणिक कठीण बनत चालले आहेत. यामध्ये कॅप्टनसी टास्क जिंकणे हा सर्वांसाठी एक महत्वाचा मुद्दा झालेला आहे. एक आठवडा नॉमिनेशन पासून सुटका मिळत असल्याने म्हणजेच एक आठवडा घरातील मुक्काम पक्का होत असल्याने कॅप्टनपद मिळवण्यासाठी स्पर्धक जीवाची पर्वा न करता, कुठलीही भीती मनात न बाळगता जीव तोडून खेळतात. हाच खेळ अमृता धोंगडेच्या अंगाशी आला आहे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

यंदा कॅप्टनपदासाठी घरात जोरदार लढत होताना दिसली. घरात हत्तीचा एक स्टॅच्यू आणला गेला,ज्याच्या गळ्यात जी टीम जास्तीत जास्त रीबन्सचा हार करुन गुंडाळेल त्यांना कॅप्टन पदाचा अधिकार मिळणार होते. दोन्ही टीमला यासाठी वेगवेगळया रंगाच्या रीबन दिल्या गेल्या. कॅप्टनपद मिळवण्यासाठी स्पर्धका अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले.

पण अमृता धोंगडेने टास्क दरम्यान घरातले जेलचे दारच तोडले. झाले असे की, स्नेहलता अक्षय केळकरला सांगते. त्यांचे सर्व हार उचलून जेलमध्ये टाक, अक्षय तसे करतोही. आता कॅप्टनसी मधून बाद होणार असे वाटत असल्याने ते हार जेल बाहेर काढण्यासाठी अमृता धोंगडे जेलचे दार तोडते. टास्क दरम्यान घराचे नुकसान झाल्याने बिग बॉस चांगलेच चिडतात. आणि तिला शिक्षा करतात.

कॅप्टनपद मिळवण्यासाठी अमृताने हे केल्याने तिला बिग बॉस दोन आठवडे कॅप्टनसीच्या उमेदवारी पासून दूर राहण्याची शिक्षा देतात. त्यामुळे अमृताला रडू कोसळते. तर या विचित्र खेळामुळे बिग बॉसच्या घरात याही आठवड्यात कुणीही कॅप्टन होऊ शकले नाही. आता यावरून काय राडा होतोय ते आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT