Bigg Boss Marathi 4 contestant Ruchira Jadhav Post after finale.. Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: 'पर्सनल लाईफ टी.व्ही वर एक्सप्रेस करणं..', सिझन संपला पण रुचिराच्या पोस्टनं खळबळ

बिग बॉस मराठी 4 मध्ये रुचिरा जाधव तिचा बॉयफ्रेंड डॉ.रोहित शिंदे सोबत सहभागी झाली होती,जिथे त्यांच्यातील वाद अन् नंतर ब्रेकअपची चर्चा रंगली होती.

प्रणाली मोरे

Bigg Boss Marathi 4: अखेर ज्या दिवसाची सर्वांना प्रतिक्षा होती तो दिवस आलाच...अक्षय केळकर बिग बॉस सिझन ४ चा विजेता ठरला. अर्थात हा शो रंगला तो सामिल झालेल्या स्पर्धकांच्या वादांनी अन् भावूक कहाण्यांनी देखील...शो मध्ये यंदा रीअल लाईफमध्ये कपल असलेले रुचिरा जाधव आणि डॉ.रोहित शिंदे ही जोडी सामिल झाली होती.

अर्थात दोघांमधलं लव्हलाईफ छोट्या पडद्यावर पाहणं लोकांनी एन्जॉय केलंच पण त्याहून चर्चेत राहिला ते रुचिरा घराबाहेर पडताना रोहित सोबतचा तिचा अबोला अन् रुसवा...दोघांचे ब्रेकअप झाल्यातच जमा होते..

घराबाहेर पडल्यावर दोघंही आमच्यात सगळं ठीक आहे असं बोलत होते खरं पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आहे हे देखील कळत होतं.(Bigg Boss Marathi 4 contestant Ruchira Jadhav Post after finale..)

पण आपण सर्वांनी पाहिलं असेल की फिनालेच्या निमित्तानं जेव्हा सगळ्या स्पर्धकांना घरात पुन्हा एकदा बोलावलं गेलं तेव्हा रुचिरानं रोहितला गोड खीर भरवली अन् त्यानंतर ज्या घरानं त्यांना वेगळं केलं असं म्हटलं जात होतं तिथेच दोघे पुन्हा एकत्र आलेले आपण पाहिले.

आता रुचिरानं फिनालेच्या दरम्यान एक पोस्ट केली जी चर्चेत आली आहे. त्यात तिनं बिग बॉस मधला आपला प्रवास सांगताना काही गोष्टींचे खुलासे केले आहेत.

तिनं लिहिलं आहे, ''मी माझा अभिनय कारकिर्दीतला प्रवास कॉलेजमध्ये नाटकात भाग घेण्यापासून केला. त्यानंतर मालिका..सिनेमे यांमधून कामास सुरुवात केली आणि तो प्रवास अजून सुरूच आहे''.

''आणि असं असताना २०२१ मध्ये मला Bigg Boss साठी विचारण्यात आलं. तेव्हा बहिणीचं लग्न असल्यामुळे मला जमलं नाही. यावर्षी पुन्हा मला विचारण्यात आलं..यावेळी एका ट्वीस्ट सहित विचारण्यात आलं. जो फक्त याच सिझनचा नाही ..तर आतापर्यंतच्या सगळ्या सिझनमधला मोठा ट्वीस्ट असणार होता. मी खूश होते, पण त्याचवेळी मनात धाकधूक होती..पण त्याहून अधिक विश्वास होता...''

''कारण स्वतःचं वैयक्तिक आयुष्य नॅशनल टेलीव्हिजनवर एक्सप्रेस करणं माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं''.

अर्थात पुढे रुचिरानं जरी स्पष्ट केलं असलं की ही पोस्ट शो संदर्भात नाही तर माझ्या वैयक्तिक अनुभवाविषयी आहे तरी वाटतंच ना की शो संपल्यानंतर तिनं मनातला राग बोलून दाखवला आहे. कारण शो मध्ये जे काही झालं त्यामुळेच तर रोहित अन् तिच्यात दुरावा आला. आणि आता फिनालेत जरी सगळं छान आहे दोघात हे दाखवलं असलं तरी अजूनही नात्यात पहिल्यासारखा गोडवा आलेला नाही हे रुचिराच्या पोस्टवरनं स्पष्ट होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT