vikas patil, vikas patil news, swami samartha, akkalkot mandir, tuljapur, gangapur, vikas patil at akkalkot SAKAL
मनोरंजन

Vikas Patil: स्वामींनी योग जुळवून आणला... विकास पाटीलने अक्कलकोटला केली हि खास गोष्ट

विकास अक्कलकोट आणि तुळजापूरला गेला असल्याचं पाहायला मिळतंय

Devendra Jadhav

Vikas Patil News: बिग बॉस मराठी ३ मधून लोकप्रिय झालेला आणि टॉप ५ पर्यंत पोहोचेलला लोकप्रिय अभिनेता म्हणजे विकास पाटील. विकास पाटील गेली अनेक वर्ष मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे.

बिग बॉस मराठी ३ मुळे विकासला फॅन फॉलोईंग जास्त मिळाली. विकासने एक खास गोष्ट केलीय ज्यामुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आलाय.

( bigg boss marathi 4 fame actor Vikas Patil did this special thing to Akkalkot swami samartha mandir)

विकासने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोतविकास अक्कलकोट आणि तुळजापूरला गेला असल्याचं पाहायला मिळतंय.

अक्कलकोट मधील पुजाऱ्यांसोबत विकासने फोटो शेयर केलाय. याशिवाय तुळजापूरला जाऊन विकासने आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलंय. या फोटोखाली कॅप्शन लिहून विकासने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विकास लिहितो... रामनवमीच्या दिवशी स्वामींना अन्न छत्रातुन नैवेद्य घेऊन जायचा सुवर्णयोग आला..आला म्हणजे काय स्वामींनीच आणला.. अक्कलकोट अन्नछत्र मंडळ आणि श्री अमोलराजे यांचे मनापासून आभार ..

तिसरा फोटो आई तुळजाभवानी तुळजापूरचा.. आणि तिथून मग गाणगापूर ...एक परिपूर्ण ट्रिप असं कॅप्शन लिहून विकासने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

अनेकांनी विकासने केलेल्या या कृतीचं कौतुक करून.. "श्री स्वामी समर्थांच्या चरणी सेवा रूजू करण्याची संधी आपणास मिळणे ही केलेली रचना म्हणजेच आपल्या पुण्याईचे आणि प्रामाणिकपणाचे द्योतक आहे. श्री स्वामी समर्थ !.. श्री स्वामी समर्थ!!..

"दादा खरंय तुझं स्वामींच्या इच्छे शिवाय काहीच शक्य नाही आणि तुला हा योग महाराजांनी घडवून आणला त्यातच खूप मोठे समाधान कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी." अशा कमेंट करून विकासचं कौतुक केलंय.

विकास बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये टॉप ५ मध्ये मजल मारणारा स्पर्धक होता. विकास पाटील, विशाल निकम, मीनल शाह, सोनाली पाटील या चौघांची बिग बॉसच्या घरातली मैत्री चर्चेत राहिली.

बिग बॉस नंतर सुद्धा हे चौघे एकमेकांना भेटत असतात. विकास अलीकडेच स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत अभिनय करताना दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT