Bigg Boss Marathi 4 prasad jawade propose amruta deshmukh in senior junior task  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मनातलं प्रेम अखेर ओठावर! प्रसादनं केलं अमृताला प्रपोज..

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात प्रेमाला सुरुवात..

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात भांडण, राडा हे तर होतंच पण या घरात प्रेम कधी आणि कुणाचं जुळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. आजवर बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वात असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेमाचे बंध विणले गेले आहेत. मग वीणा- शिवचे नाते असो वा राजेश-रेशम किंवा रूपाली-पराग. अशा अनेक जोड्या प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आता प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत असे दिसते. मध्यंतरी समृद्धी आणि त्रिशूल यांच्यात काहीतरी जुळेल असे वाटले होते पण त्रिशूल घराबाहेर पडला पण आज तर प्रसाद जवादेने अमृता देशमुखाला प्रपोज केले आहे.

'बिग बॉस मराठी' चे चौथे पर्व सुरू होऊन आता महिना उलटला असून घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. कुरघोडी, ग्रुप करणे, एकमेकांना घराबाहेर काढणे यासाठी चांगलीच चुरस वाढली आहे. रोज नवीन राडा, नवीन टास्क यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होतेच आहे पण बिग बॉसच्या घरात प्रेमाचे गुलाब कधी फुलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर तो क्षण काल आलाच..

(Bigg Boss Marathi 4 prasad jawade propose amruta deshmukh in senior junior task )

कालच्या भगत 'बिग बॉस'च्या कॉलेजमध्ये सीनियर-ज्युनियर हा टास्क सुरू होता. यावेळी सीनियरने ज्युनियर कडून कामं करून घ्यायची, त्यांना वेगवेगळे टास्क द्यायचे असे सांगितले होते. यावेळी प्रसाद ज्युनियर तर अमूर्ता देशमुख आणि अपूर्वा सीनियर गटात असतात. त्यामुळे अचानक अपूर्वा प्रसादला म्हणते, या क्षणाला अमृता देशमुखला प्रपोज कर.. आणि प्रसाद चक्क गुडघे टेकून तिला प्रपोज करतो.

यावेळी तो अमृताला म्हणतो, 'आपल्याला तुमच्या नावाने चिडवतात. आपल्याला या तुमच्या टॉकरवडीचा छोटासा घास घ्यायचाय..' आणि सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. पुढे तो म्हणतो, मला तुझी खरी वाली फ्रेंडशिप देशील का? त्यावर अमृता म्हणजे फ्रेंडशिप आहेच.. तर कुणीतरी मागून म्हणत.. 'अरे लव्हशिप माग'.. त्यावर प्रसाद म्हणतो.. 'आधी फ्रेंडशिप तर चांगली होऊदे मग पुढचं पुढे बघू..' हे प्रपोज पाहून घरातील सदस्यच नाही तर प्रेक्षकही अवाक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT