Bigg Boss Marathi 4 sosal titkach social task apurva nemlekar angry on amruta dhongade and akshay kelkar  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: अपूर्वाने धुव्वा उडवला! अक्षयचा केला घोडा, अमृता कोसळली..

“सोसल तितकंच सोशल" टास्कमध्ये अपूर्वाने विरोधी टीमची चांगलीच खोड मोडली..

नीलेश अडसूळ

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या “सोसल तितकंच सोशल" या टास्कची एक फेरी काल आपण पाहिली. यावेळी स्पर्धकांनी कहर केला. तर आजच्या भागात दुसरी टीम कार करतेय ही दिसणार आहे. काल अपूर्वाने सगळं सहन केलं, तर आज अपूर्वा सगळ्यांना सहन करायला लावणार आहे. त्यामुळे आजच्या भागात मोठा राडा होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या “सोसल तितकंच सोशल" टास्कमध्ये सदस्यांच्या सहनशक्तीचा कस लागला. काल प्रसाद, अपूर्वा, तेजस्विनी, रोहित टास्कमधून बाहेर पडले. यावेळी अक्षयच्या टीमने प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित, स्नेहलता, तेजस्विनी यांना अनेक न सोसणाऱ्या गोष्टी करायला भाग पाडलं. कुणाला मिरच्या खाऊ घातल्या, कुणाला अंडी पाजली तर कुणाला ओले कपडे एक हातावर धरून उभं केलं. एवढच नाही तर एकमेकांची डोकी भादरण्यापर्यंत टोक गाठलं. यावेळी अपूर्वा चांगलीच संतापली होती. उद्या आमची वेळ येईल तेव्हा बघा काय करते, असं खुलं आव्हान तिने दिलं होतं. आजच्या भागात हाच राडा पाहायला मिळणार आहे.

आज अक्षयला काही विचित्र टास्क करायला लागू नये म्हणून तो घरातली सगळी अंडी वाया घालवतो. म्हणून अपूर्वा चांगलीच संतापलेली असते. त्यामुळे प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित सगळेच अक्षय जाब विचारणार आहेत कि त्याने काल असे का केले. प्रसाद आणि अपूर्वा विचारताना दिसणार आहेत, 'अक्षा तू दोन ते तीन ग्रेड अंडी फोडलीस? तू ती वेस्ट केलीस एवढी लागली देखील नसती कदाचित...'

अक्षयचे म्हणणे आहे, 'काय करणार मला नाही माहिती, रणनिती असू शकते... प्रसाद म्हणाला कोणाची रणनिती ? अपूर्वाचे म्हणणे आहे, रणनिती कशी असू शकते ? ब्रेकफास्टला लागतं ना ? अक्षयचे म्हणणे आहे, सी सॉ टास्कला गव्हाचे पीठ संपलं होतं सगळ्यांनी सफर केलं होतं कि नाही? अपूर्वा म्हणाली, ९० अंडी फोडली ?' याचाच राग म्हणून अपूर्वा चांगलीच चवताळली आहे..

आज ती समोरच्या टीमचा अक्षरशः धुव्वा उडवताना दिसणार आहे. यावेळी तिने अक्षयचा घोडा करून त्यावर ती स्वतः बसली आहे. तर अमूर्ताला तिने असा मिल्कशेक बनवून दिला आहे की अमृता तो पिताच घरात गडागडा लोळली. तर काहींची तिने अर्धी डोकी भादरून घेतली. अजून अपूर्वाने बरच काही केलं आहे, ते आजच्या भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT