Marathi Bigg Boss 4 winner  Esakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: आज मिळणार बिग बॉसला त्याचा चौथ्या सिझनचा विजेता; 'हे' आहेत दावेदार

Vaishali Patil

बिग बॉस ४ हा सिझन आता त्याच्या शेवटच्या दिवसावर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरात स्पर्धकांचा खेळ, त्यांची मैत्री,त्यांनी केलेले राडे यामुळं प्रेक्षकाचं भरभरुन मनोरंजन केलं. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास टॉप पाच स्पर्धकांवर आला आहे.

मात्र आज या सिझनला त्याचा विजेता मिळणार आहे. तो कोण असेल हे तर आज संध्याकाळी कळेलच मात्र महा अंतिम सोहळ्यात विजेत्यापदासाठी पाच दावेदार आहेत. त्याचा थोडक्यात माहिती .. आता घरात आहेत टॉप ५.अमृता धोंगडे,किरण माने,अक्षय केळकर,अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत.

अपूर्वा नेमळेकर: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही बिग बॉसच्या घरात आल्यापासूनचं प्रेक्षकांच्या नजरेत आली. तिने तिच्या खेळीच नाही तर तिच्या घरातील इतर स्पर्धकांसोबत नातं ही जोपासलं. यामूळेच तिने चाहत्यांची मने जिकंत ती मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून ती थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली.

अक्षय केळकर:

एक मास्टर माइंड म्हणुन अक्षय केळकरला बिग बॉसच्या घरात ओळखतात. ते त्याच्या मेहनतीवर शोच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचला. तो खूप हुशारीने तो खेळला. तो कायम सगळ्यांशी जुळवून घेत राहीला. बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्या पासूनच त्याने स्वतःचं वेगळेपण दाखवलं. तो या सिझच्या विजेतेपदाचा भक्कम दावेदार आहे.

किरण माने:

बिग बॉस मराठीच्या घरातील एक वादग्रस्त चेहरा म्हणजे किरण माने. किरण माने यांचे बाहेरच्या जगातील गाजलेले वाद आपल्याला परिचित आहेच, म्हणून हा चेहरा बिग बॉसच्या घरात आला. घरात त्याने राडे घातले, दंगा घातला मात्र मैत्रीही जपली ,प्रेक्षकांच मनोरंजन केलं आणि त्यामुळेच तो आता फिनालेमध्ये आहे. बिग बॉसने साताऱ्याचा बच्चन अशी किरण मानेची ओळख दिली.

राखी सावंत:

बिग बॉस मराठीच्या घरात राखी सांवत नावाचं वादळ आलं आणि तिने तिच्यासोबत सर्व स्पर्धकांनाच नव्हे तर प्रेक्षंकानाही वेड लावलं. तिने तिच्या विनोदीशैलीने सर्वांना खळखळून हसवलं. तिने सदस्यांसोबत मस्ती केली तर कधी घरातील पुरुष मंडळीसोबत फ्लर्ट करतांना दिसली. मात्र तिच्या घरात योण्याने घरातील वातावरण बदललं हे मात्र नक्कीच.

अमृता धोंगडे:

मिसेस मुख्यमंत्री या मालिकेमुळं घराघरांत पोहोचलेली अमृता बिग बॉसच्या घरात नेहमीच स्पर्धकांच्या निशाण्यावर होती. तिने घरात बराच गोंधळ घातला. ती सर्वांसोबत भांडतांना दिसली. मात्र तिने तिच्या खेळात बरिच सुधारणा केली आणि आज ती टॉप ५ मध्ये पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT