shiv thakare and veena jagtap 
मनोरंजन

वीणासोबत ब्रेकअपच्या चर्चांना उधाण; शिव ठाकरे म्हणतो..

स्वाती वेमूल

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये एक सेलिब्रिटी जोडी जोरदार चर्चेत होती. या रिअॅलिटी शोमध्ये दोघांची ओळख झाली, मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. 'बिग बॉस' जिंकण्यासाठी शिव ठाकरे आणि वीणा जगतापने ड्रामा केला, अशीही टीका त्यांच्यावर झाली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करत त्यांनी प्रेमाची जाहीर कबुली दिली. रिअॅलिटी शो संपल्यानंतरही हे दोघं एकत्र होते. मात्र आता शिव-वीणाच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगतेय. या चर्चेमागचं कारणही तसंच आहे. आधी सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेमळ पोस्ट टाकणारे शिव-वीणा आता एकमेकांविषयी काहीच बोलत नाहीत. इतकंच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात शिवसोबत वीणा कुठेच दिसली नाही. हा कार्यक्रम शिवसाठी खूप खास होता. कारण त्याचा 'बी रिअल' हा ब्रँड लाँच करण्यात आला होता आणि कार्यक्रमाला वीणा गैरहजर होती. 

बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांनी या दोघांमध्ये प्रेम फुलतानाचं पाहिलं. अनेकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला आणि बिग बॉसनंतर हे दोघं एकत्र राहणार नाहीत असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्येक कार्यक्रमात या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. सोशल मीडियावर एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना पाहिलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर या दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. आता गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

ब्रेकअपच्या चर्चांवर काय म्हणाला शिव ठाकरे?
"सध्या आमच्या दोघांचंही वेळापत्रक खूप व्यग्र आहे. ती मालिकेच्या कामात बिझी असते आणि मी माझ्या ब्रँड लाँचिंगच्या कामात मग्न आहे. अंतर वाढलं की रुसवे-फुगवे होतातच, प्रसंगी वादही होतात. मात्र त्यातूनच प्रेम आणखी दृढ होतं. सध्या आम्ही दोघंसुद्धा करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहोत. योग्य वेळ येईल तेव्हा लग्नाचा विचार करून लग्नबंधनात अडकायला आवडेल", असं उत्तर शिवने दिलं. 

शिव ठाकरेने 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता तो स्वत:चा ब्रँड लाँच करत आहे. 'बी रिअल' हा शिवचा डिओडरंट ब्रँड असल्याचं म्हटलं जातंय. तर वीणा 'आई माझी काळूबाई' या मालिकेत भूमिका साकारत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बनावट आयपीएसने आधीही केलेत कांड, परराज्यात नावावर गुन्हा; पत्नी आहे पोलीस अधिकारी

Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Latest Marathi News Live Update : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

Girish Mahaja : नाशिक-त्र्यंबक रस्ता पाडकाम वाद मिटला! गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर १३ दिवसांचे साखळी उपोषण स्थगित

Vasudev Tradition: 'परंड्यातील सुरेश सुरवसेंकडून वासुदेव संस्कृतीचे जतन'; पदवीपर्यंत शिक्षण घेऊन जपली पिढ्यांपासूनची परंपरा..

SCROLL FOR NEXT