bigg boss marathi season 3 file image
मनोरंजन

बिग बॉस मराठी ३ लवकरच; महेश मांजरेकरांनी शेअर केला व्हिडीओ

'दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार'

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ची लोकप्रियता प्रचंड आहे. या शोमधील स्पर्धक रोजच्या निरनिराळ्या टास्कने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या शोच्या गेल्या दोन्ही सिझनचे सूत्रसंचालन मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी केले. महेश त्यांच्या सूत्रसंचालनाच्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकतात. नुकताच त्यांनी बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi season 3) नव्या सिझनचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये नव्या सिझनबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. (bigg boss marathi season 3 mahesh manjrekar announcement)

कोरोनामुळे महाराष्ट्रामध्ये मालिका, शो आणि चित्रपटांचे चित्रीकरणाला गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद होते. त्यामुळे गेल्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. आता चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'हिंदी बिग बॉस' प्रमाणे 'मराठी बिग बॉस'चे चित्रीकरण देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. 'त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार राहा… #BiggBossMarathi3 लवकरच #ColorsMarathi वर' असे कॅप्शन देऊन महेश मांजरेकर यांनी बिग बॉसच्या नव्या सिझनचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. बिग बॉसच्या इतर सिझन प्रमाणे या नव्या सिझनचे देखील सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत.

बिग बॉसमध्ये 15 स्पर्धक एकत्र राहतात. त्यांच्यामधील मतभेद, धमाल, मस्ती प्रेक्षकांच्या नेहमी पसंतीस पडते. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे विजेती ठरली होती. तर दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे झाला. आता या नव्या सिझनमध्ये कोणते स्पर्धक असतील आणि बिग बॉसची ट्रोफी कोण जिंकेल याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT