Bigg Boss OTT 2 Bigg Boss OTT 2 Abhishek Malhan proposes Jiya on his knees Esakal
मनोरंजन

Bigg Boss OTT 2: बिग बॉसच्या घरातच उरकला जिया अभिषेकचा साखरपूडा? व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

'बिग बॉस OTT 2' च्या फिनालेला आता थोडेच दिवस शिल्लक आहेत. घरातील स्पर्धकही कमी झाले आणि आता फायनल पर्यंत कोण कोण शोमध्ये राहणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहे. या आठवड्याचा विकेंड का वार खुप खास होता. कारण या आठवड्यात झालेले वादविवाद आणि स्पर्धकांमधील गैरसमज सलमानने कमी केले.

'विकेंड का वार'मध्ये रॅपर एमीवे बंटाई हा शोमध्ये दिसला. त्याने त्याच्या गाण्यावर प्रेक्षकांना नाचवलं आणि खुप मनोरंजनही केलं. या आठवड्यात प्रमोशनसाठी श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा आले होते. त्यांनी त्यांची नवी वेबसिरिज 'कलकूट' चं प्रमोशन केलं.

कॉमेडियन भारती सिंग हिने देखील या एपिसोडमध्ये खुप मजा केली. तिने सर्व स्पर्धकांना पोट धरुन हसवले मात्र त्यासोबत तिने असं काही केलं कि त्यामुळे जिया अन् अभिषेकचे चाहते खुप खुश झाले. बिग बॉस ओटीटीच्या या 'वीकेंड का वार' कॉमेडियन भारती सिंग पाहूणी बनुन आली आणि तिने खुप सारे गेम खेळले.


Bigg Boss OTT 2 Abhishek Malhan proposes Jiya on his knees

या गेममध्ये भारतीने स्पर्धकांना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या सर्वात आवडत्या व्यक्तीला त्या वस्तू भेट द्यायला सांगितल्या.

यावेळी जिया शंकरला भारतीने एक अंगठी दिली. भारती तिला सांगते की ज्या व्यक्तीसोबत तूला रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे त्याला ती अंगठी दे. तेव्हा जिया लाजत अभिषेक मल्हानला बोलावत. तो लाजत स्टेजवर येतो.

दोघेही एकमेकांना पाहून खुपच लाजतात. मग अभिषेक गुडघ्यावर बसून जियाच्या बोटात अंगठी घालतो. हे सगळं पाहिल्यानंतर घरातील काही सदस्य हैराण होतात तर काही टाळ्या वाजवून दोघांना शुभेच्छा देतात.

गेल्या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये बरेच वाद निर्माण झाले होते. मात्र त्यापुर्वी त्याच्यात चांगले संबध होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना खुप आवडत होती. गैरसमजामुळे त्याच्यात वाद झाले मात्र सलमान खानने ते मिटवले.

आता पुन्हा दोघांमध्ये मैत्री झाल्याचं दिसत आहे. आधीही दोघांमध्ये काहीतरी शिजतयं अशी चर्चा रंगली होती. दोघांचा डान्सही खुप व्हायरल झाला होता. त्यानंतर जियाने अभिषेकसाठी 'छुपाना भी नहीं आता, दिखना भी नहीं आता' हे गाणे निवडलं होते. या गाण्यावर दोघेही एकत्र डान्स करताना दिसले. आता जिया आणि अभिषेक मल्हान यांच्यातील प्रेम आणखी फुलेल अशी आशा दोघांचे चाहते व्यक्त करत आहे.

सोशल मिडियावर दोघांच्या नावाचा ट्रेंड व्हायरल होत आहे. जिया आणि अभिषेक यांचे नावं एकत्र करत त्याच्या चाहत्यांनी #Abhiya हे हॅशटॅगही ट्रेंड केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit: रोहित शर्मा मॅच खेळत होता अन् 'तो' अचानक कोसळला; तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पळापळ झाली अन् सर्वच घाबरले

Railway Ticket Upgrade : स्लीपरच्या पैशात AC चा प्रवास! तेही एकही रुपया जास्त न देता? जाणून घ्या काय आहे रेल्वेचा ऑटो अपग्रेड नियम

New Year Trip Places : कमी खर्चात नव्या वर्षाची ट्रीप प्लॅन करताय? 'ही' आहेत 5 बेस्ट ठिकाणे..कमी पैशात डबल मजा

Pune: परवानगी नसेल तर सभा महागात पडणार अन्...; पुणे महापालिकेचे रॅली-सभांसाठी कडक नियम लागू

Capricorn Yearly Horoscope 2026: राहु, शनि आणि गुरु कसा बदलणार तुमचं आयुष्य; वाचा संपूर्ण वार्षिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT