Avinash-Falaq: Esakal
मनोरंजन

Avinash-Falaq: बिग बॉसच्या घरात पुन्हा सुरु झालं 'इश्कवाला लव्ह'! अविनाशनं शेवटी 'तिला' मनातलं सांगून टाकलं..

Vaishali Patil

Bigg Boss OTT 2 Avinash Sachdev Confesses His Feelings: बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन सध्या जोरात सुरु आहे. लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त असलेल्या हा शो आता रंगात आला आहे. या शोमध्ये स्पर्धकांचे खरे चेहरेही उघड होत आहे.

हे बिगबॉस ओटीटी इतर सिझनपेक्षा वेगळं आहे. बऱ्याच वाद विवादानंतर आता या सिझनमध्येही प्रेमाला बहर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश सचदेव आणि फलक नाझ यांच्यात काहीतरी सुरु आहे अशी कुणकूण प्रेक्षकांना होतीच.

'बिग बॉस OTT 2' च्या सुरुवातीपासून फलक नाझ आणि अविनाश सचदेव हे चांगले मित्र आहेत. कधी फलक नाज अविनाशवर रागावताना दिसायची तर कधी अविनाश तिची समजूत घालताना दिसतो. दोघेही एकमेंकाची काळजी घ्यायचे.

दोघे गेल्या काही काळापासून एकमेकांसोबत खूपच कॉलिटी टाईम घालवत होते. त्यांचे बॉन्ड पाहून चाहत्यांना त्याच्यात काहीतरी शिजतयं असं वाटलं आणि तसचं काहीस झालं आहे. शेवटी अविनाशने आता त्याच्या मनातल्या भावना फलकला सांगितल्या आहेत.

त्याचवेळी अविनाशने शीजान खानच्या बहिणीसमोर त्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रोमोमध्ये तो म्हणतो की, 'मला तू आवडतेस'.

पुढे तो म्हणतो की, दुसऱ्या आठवड्यापासूनच त्याला या भावनेची जाणिव झाली होती. नंतर या भावना काळानुसार वाढत गेल्या. तो त्या घरात पुढे राहणार की नाही हे त्याला माहित नसल्यानं फलकला ही गोष्ट माहित असली पाहिजे.

हे ऐकल्यानंतर फलक फक्त लाजत आणि हसत होती. त्यानंतर अविनाशने त्याचे मित्र जैद आणि जियालाही आपण प्रेमाची कबूली दिल्याच सांगितल आहे.

अविनाश हा प्रेमात नेहमी अपयशीच राहिला आहे. तो सुरवातीला रुबिना दैलिकला डेट करत होता. 2012 मध्ये अविनाश आणि रुबिनाचं ब्रेकअप झालं.

रुबिनानंतर अविनाशच्या आयुष्यात पलक पुरस्वानीचा आली मात्र दीड वर्षात दोघांचे ब्रेकअप झाले.

त्यानंतर 2015 अविनाशने टीव्ही अभिनेत्री शामली देसाईसोबत लग्न केले होते.मात्र लग्नाच्या दोन वर्षानंतरच दोघांनी घटस्फोट घेतला होता.

त्यामुळे आता अविनाश आणि फलक यांची लव्हस्टोरी घरात सुरु होईल की नाही की फक्त शो ची टिआरपी वाढवण्यासाठी हा गेम आहे हे येणाऱ्या काही ऐपिसोडमध्ये कळेलच.

यावेळी अविनाश सचदेव, पूजा भट्ट, फलक नाझ, मनीषा राणी, बाबिका ध्रुवे, सायरस ते जैद हदीद हे नॉमिनेट झाले आहे. आता यातुन एक स्पर्धक रविवारी घरातुन बाहेर जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT